India Languages, asked by shiraskarsmita11, 8 months ago

वाक्यात उपयोग करा
१) दुथडी भरून वाहणे
२) तहानभूक हरपणे
३) हिरमोड होणे
४) पोटोबाची पूजा करणे
५)वणवण फिरणे
६) पोटभर मार खाणे
७) काळजाला घरे पडणे
८) अंगावर काटा येणे
९) हैरान होणे
१०) मनमानी करणे
११) कानोसा घेणे
१२) आवाहन करणे
१३) कावरेबावरे होणे
१४) अंगावर तुटून पडणे
१५) घाव सोसणे​

Answers

Answered by adityakamble2311
21

Answer:

१) मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत होती.

२) तहानभूक हरपून काम केल्याशिवाय यशाची गोडी चाखता येत नाही .

३) बाबांनी सहलीवरून येताना काहीही आणले नाही त्यामुळे नेहाचा हिरमोड झाला .

४) शेतकऱ्यांनी भरपूर काम केल्यानंतर पोटोबाची पूजा केली .

५) अमर प्रश्नसंच शोधण्यासाठी वणवण फिरला.

६) आईला न सांगताच बाहेर गेलेला उमेश घरी येताचं आईने त्याला पोटभर मार दिला.

७) अनिलचा आवडता कुत्रा अपघातात मरण पावल्यामुळे , अनिलच्या काळजाला घरे पडली.

८) इतिहासातील लढायांचे वर्णन वाचताना अंंगावर काटा उभा राहतो .

९) अचानक सैन्यात गोंधळ दिसल्यावर शायिस्तेखान हैराण झाला.

१०) इंग्रज भारतातील लोकांवर मनमानी करत.

११) भूकंप झालेल्या ठिकाणचा जिल्हाधिकाऱ्यांनी कानोसा घेतला.

१२) मुसळधार पावसामुळे नदीला महापूर आल्याने प्रशासनाने लोकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले.

१३) पायी सहलीला जाताना समोर अचानक साप आल्याने मुले कावरीबावरी झाली .

१४) सिद्धीच्या सैन्यावर बाजीपरभू देशपांडे अंगावर तुटून पडले.

१५ ) तानाजी मालुसरे यांनी ढाल तुटली असताना आपला शेला हाताला गुंडाळून त्यावर उदयभानच्या तलवारीचे घाव सोसले .

Jay Maharashtra ❤️

Keep Supporting.. ❤️

Answered by mehmood0735
0

Explanation:

जोड़ियां करूंगा हनी Asadullah Ilaha Illallah muhammadur rasulullah

Similar questions