Sociology, asked by dalvidipali68, 3 months ago

विखंडित अस्थि भंग मनजे काय​

Answers

Answered by NITESH761
11

Answer:

ज्यामध्ये हाड तर मोडतेच पण वरच्या त्वचेला व मऊ भागांनाही जखम होते अशा अस्थिभंगास अवघड किंवावाईट अस्थिभंग असे म्हणावे

Answered by anjumraees
1

Answer:

हाड हा मुळात कठीण आणि मजबूत पदार्थ आहे. उतारवयातकाही आजारात, आणि चुन्याच्या अभावामुळे मात्र हाड नाजूक आणि ठिसूळ होऊन एवढया तेवढया कारणाने मोडते. अपघातामध्ये वेडावाकडा मार लागून हाडे मोडण्याचा संभव असतो. हाड मोडणे म्हणजेच'अस्थिभंग'. अस्थिभंगाचे विविध प्रकार आहेत.

Explanation:

) विखंडित : दोहोंपेक्षा जास्त तुकडे होणे.

(1) उपद्रवयुक्त : तंत्रिका, रोहिणी, संधी वगैरे इतर अवयवांना इजा झालेली असणे.

(2) अग्रप्रवर्ध विलग होणे : लांब अस्थींची वाढ होत असताना त्यांच्या टोकावर असलेले अग्रप्रवर्ध (ज्यामुळे अस्थीची वाढ होते असा भाग) निसटणे. हा प्रकार वयाच्या १८ ते २० वर्षांपर्यंतच दिसतो.

अस्थिभंगाचे विविध प्रकार

लहान मुलांची हाडे लवचीक असतात. त्यामुळे ती पूर्ण न मोडता हिरवट फांद्याप्रमाणे केवळ एक बाजूला मोडतात. पूर्ण ताटातूट न झाल्यामुळे तुकडे एकमेकांबरोबर राहतात. असा अस्थिभंग केवळ क्ष-किरणांनी दिसतो व लवकर जुळून येतो. नंतरच्या वयात मात्र हाडे कडक असतात आणि वाळलेल्या काठीप्रमाणे काडकन तुकडे होतात.

काहीवेळा ज्या अस्थिभंगामध्ये त्वचेला जखम न होता अस्थिभंग आतल्या आत राहतो. याला केवळ अस्थिभंग असे म्हणावे. ज्यामध्ये हाड तर मोडतेच पण वरच्या त्वचेला व मऊ भागांनाही जखम होते अशा अस्थिभंगास अवघड किंवावाईट अस्थिभंग असे म्हणावे. हा अवघड अशासाठी, की जखमेत सूक्ष्मजंतू मिसळून पू होणे, सूज येणे, ताप येणे, जखम चरत जाणे वगैरे समस्या निर्माण होतात.

ज्या अस्थिभंगात हाडाचे तुकडे खूप होतात त्याला चुरा अस्थिभंग म्हणावे.

अस्थिभंगाची लक्षणे व निदान

वेदना :

अस्थिभंगामुळे असह्य वेदना होते. ही वेदना अस्थिभंगाच्या जागी होते. वेदनेच्या जागेवरून अस्थिभंग कोठे आहे हे शोधता येते. हालचालीने वेदना वाढते.

हालचालीवर बंधने :

अस्थिभंगामुळे त्या भागाची हालचाल कमी होते किंवा बंद पडते. हाड तुटल्यामुळे पुढची हालचाल होत नाही. हालचालीमुळे वेदना होत असल्याने ती व्यक्ती तो भाग हालवायला तयार नसते.

त्या भागाचा आकार नेहमीपेक्षा वेगळा विचित्र दिसणे :

अस्थिभंग होऊन हाडाचे तुकडे वेगवेगळे झाले असतील तर त्या भागाचा आकार नेहमीपेक्षा वेगळा दिसतो. सूज जास्त असेल तर मात्र हा विचित्र आकार लपून जातो.

सूज :

अस्थिभंगाने अंतर्गत रक्तस्राव होतो. त्यामुळे तो भाग सुजतो.

आवाज : अस्थिभंगाच्या जागी हाताने थोडे दाबून पाहिल्यास हाडांचे तुकडे एकमेकांवर घासल्याचा (कडकड वाजल्याचा ) अनुभव येईल.

वेदना, सूज, हालचालींवर बंधन, वेगळा आकार व टोके घासल्याचा आवाज यावरून अस्थिभंगाचे निदान बहुतेक वेळा खात्रीने करता येते. क्ष-किरण चित्रात अधिक माहिती मिळते. अस्थिभंगाची जागा, प्रकार, एकूण नुकसान, तुकडे कोठे आहेत हे सर्व क्ष-किरण चित्रात स्पष्ट कळून येतात. विशिष्ट अस्थिभंग (उदा. कवटी, हाताची बोटे, पाऊल, इ.) नुसत्या तपासणीवरून खात्रीपूर्वक सांगता येत नाही, पण क्ष-किरण चित्रात हे स्पष्ट होते. अस्थिभंगावर उपचार केल्यानंतरही क्ष किरण चित्र काढून हाडे नीट बसली आहेत की नाही, ते कळते.

Similar questions