India Languages, asked by sairam22082003, 1 year ago

१० वी निरोप समारंभ मनोगत भाषण

Answers

Answered by gadakhsanket
182
नमस्ते,

● १० वी निरोप समारंभ भाषण -

नमस्कार मित्रांनो, मी चेतन महाजन. येथे उपस्थित माझ्या सर्व गुरुजनांना नतमस्तक होऊन मी माझे भाषण सुरू करतो.

५ ला असताना सर्वप्रथम या शाळेत पाऊल टाकले. नवीन इमारती, नवीन पुस्तक, नवीन मित्र आणि नवीन शिक्षक सर्वच काही अनोळखी. परंतु या शाळेतील वातावरणाने कधी उदास होऊ दिल नाही. शाळेतील सगलेच शिक्षक अगदी उत्साहाने आणि आतुरतेने शिकवतात.

आता १० वी ची परीक्षा दिली. नवीन कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. त्यासाठी ह्या शाळेची आणि येथील शिक्षकांना निरोप द्यावा लागतोय याचे अतोनात दुःख होत आहे. ५ वी ते १० वी या शिक्षकांनी सांभाळून घेतलं. अभ्यासाशिवायच्या इतर उपक्रमात, स्पर्धात, कलाक्षेत्रात शाळेने खूप काही संधी मिळवून दिल्या. आता इथून पुढे स्वतःच बघावं लागणार सगळं.

जाता जाता एवढंच म्हणतो - निरोपाचा क्षण नाही;
शुभेच्छांचा सण आहे
पाऊल बाहेर पडताना
रेंगाळणारं मन आहे !

धन्यवाद...
Answered by devanshpatil9421
6

Explanation:

१० वी निरोप समारंभ मनोगत भाषण

Similar questions