१. वासुदेव कसा दिसतो, त्याचे वर्णन करा,
Answers
Answered by
5
वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी,गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा,हातात तांब्याचे कडे,कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे या वेषामुळे वासुदेव अगदी ठळकपणे ओळखू येतो. वासुदेव मुख्यत: क्षेत्राच्या ठिकाणी आढळून येतो. तो खेड्यापाड्यात नेहमी आणि शहरांतही कधीमधी दिसतो
plz mark as brainliest
Answered by
5
उत्तर→→→→→↓
★ वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी,गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा,हातात तांब्याचे कडे,कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे या वेषामुळे वासुदेव अगदी ठळकपणे ओळखू येतो. वासुदेव मुख्यत: क्षेत्राच्या ठिकाणी आढळून येतो. तो खेड्यापाड्यात नेहमी आणि शहरांतही कधीमधी दिसतो.
hope it helps u ,..........please brainiest it and follow me
Similar questions