India Languages, asked by shababdigital111, 7 months ago


विषय -मराठी
बातमी लेखन
प्रश्न- 'मराठी वक्तृत्व स्पर्धा'​

Answers

Answered by manishabansode404
1

Answer:

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पिंपरी-चिंचवड विभाग यांच्यावतीने आठ मार्चला बेरोजगारी विषयावर पिंपरीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

युवक काँग्रेसने देशभरात राष्ट्रीय बेरोजगार नोंदणीची मागणी केली आहे. भारतातील बेरोजगारीवर युवकांचे विचारमंथन व्हावे, युवकांमधील ऊर्जावान व सक्षम वक्ता पुढे यावा आणि त्यांना युवक काँग्रेसच्या विचारधारेमध्ये काम करण्याची संधी मिळावी यासाठी बेरोजगारी विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर १५ मार्च रोजी राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. स्पर्धेमध्ये १८ ते ३५ वयोगटातील युवक सहभागी होऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी 'मोठा बाबा शिकला आणि घरीच असतो आता', 'हिंडतो दाही दिशांना प्रश्न माझ्या नोकरीचा', 'साहेब सांगा अमा बेरोजगारांचे तुम्ही काय करायचे ठरवले आहे?' हे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे तीन हजार, • दोन हजार आणि एक हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत, अशी माहिती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिली.

Similar questions