वृत्तांत लेखन तयार करा :-
विद्यासागर विद्यालय येथे मराठी भाषा दिन साजरा.
Answers
Explanation:
मराठी भाषा गौरव दिन (मराठी राजभाषा दिन) हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.[१]
१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारा 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. १ मे १९६६ पासून तो अंमलात आला.[२]
हे सुद्धा पहा
संदर्भ
Answer:
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मंगळवारी शहर परिसरात दिंडी, काव्यमैफल, सामूहिक वाचन यांसह इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक विश्वात तर चिमुकल्यांनी संत, साहित्यिक यांच्यासह पारंपरिक वेशभूषा परिधान करत मराठीचा टिळा कपाळी लावला. राजकीय पक्ष कार्यालयातही मराठी दिन उत्साहात साजरा झाला.
येथील कुसुमाग्रज स्मारक परिसरात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सकाळी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले. यानंतर महापौर रंजना भानसी, महापालिकेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमाग्रज स्मरण यात्रेत पहिले पुष्प किशोर पाठक यांच्या संकल्पनेवर कविश्रेष्ठ ‘कुसुमाग्रजांच्या कवितांचा आविष्कार-सुवर्ण किरणावली’ ने गुंफले गेले. कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांना छंदबध्द करत मकरंद हिंगणे यांनी संगीत दिले. कुसुमाग्रजांच्या कवितांचे यावेळी वाचन तसेच गायन झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजगड कार्यालय येथे कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.