वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा.
Answers
मराठी वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप हा खूप व्यापक विषय आहे, कारण त्याची सुरुवात ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या बाळशास्त्री जांभेकर यांच्या पहिल्या मराठी वर्तमानपत्रापासून होते आणि त्याला शेवट किंवा समाप्ती नाही. आज प्रकाशित होणारी संख्येने भाराभर वृत्तपत्रेही येथे विचारात घ्यावी लागतील. गेल्या १८० वर्षांचा आणि त्यातून चाललेल्या व आज अस्तित्वात नसलेल्या अशा हजारभर नियतकालिकांचा सर्वसाधारण आढावा घ्यावा लागेल. अर्थात यातील तपशिलाला ङ्गाटा देऊन बदलाचे सूत्र, प्रवास आणि स्वरूप याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.
★ उत्तर - स्वातंत्र्यापूर्वी काळातील वृत्तपत्रांच्या स्वरूपात आणि उद्दिष्टांत वर्तमानकाळात पुढील बदल झाले आहेत.
*कृष्णधवल रंगात छापली जाणारी वृत्तपत्रे आता रंगीत छापली जातात.
*जिल्ह्याचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांना खूप मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या पत्रांशी स्पर्धा करावी लागत आहे.
*दैनंदिन घडामोडींच्या ताज्या बातम्या देणे.
*जाहिराती छापून उद्योग व्यवसायाला चालना देणे.वृत्तपत्रे आता अधिकच सक्रिय होऊन सामाजिक कार्यही करू लागले आहेत.
*लोकमत घडवणे, प्रबोधन करणे.
*आजची वृत्तपत्रेविविध मार्गांनी समाजाचा महत्त्वाचा घटक बनली आहेत.
धन्यवाद...