'वाटही कथा कोणत्या समाजाचे दर्शन घडविणारी आहे?
Answers
Answer:
ग्रामीण सुख-दुःखाची नस ज्यांना नेमकेपणी उमगलीय, अशा मोजक्या लेखकांतलं आघाडीचं नाव म्हणजे प्राचार्य रा. रं. बोराडे. आपल्या कथा-कादंबऱ्यांतून ग्रामीण जनतेच्या भावनांना मोकळी वाट करुन देणाऱ्या बोराडे यांच्या लेखनवैशिष्ट्याविषयी…
Explanation:
ग्रामीण सुख-दुःखाची नस ज्यांना नेमकेपणी उमगलीय, अशा मोजक्या लेखकांतलं आघाडीचं नाव म्हणजे प्राचार्य रा. रं. बोराडे. आपल्या कथा-कादंबऱ्यांतून ग्रामीण जनतेच्या भावनांना मोकळी वाट करुन देणाऱ्या बोराडे यांच्या लेखनवैशिष्ट्याविषयी…
प्राचार्य रा. रं. बोराडे हे मराठवाड्याच्या मातीमधून समर्थपणे उदयाला आलेले बी. रघुनाथानंतरचे यशस्वी कथाकार व कादंबरीकार. शेतकीर कुटुंबातला जन्म असल्यामुळे शेतकऱ्याच्या दुःखाच्या नाळेशी ते आपसूकच जोडले गेले आहेत.
मानसिकतेचे मनोहारी दर्शन घडविले आहे. मराठी साहित्यविश्वात उद्धव शेळके यांची ‘धग’ आणि रा. रं. बोराडे यांची ‘पाचोळा’ या दोन कादंबऱ्यांची नेहमी तुलना केली जाते. शहरीकरणामुळे उद्ध्वस्त होत चाललेले पारंपरिक व्यवसाय आणि त्यावर गुजराण करणाऱ्या कारागिरांच्या कुटुंबाची होत असलेली वाताहत ही ‘पाचोळा’ कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. कादंबरीची नायिका पारबती हिच्या प्रथमपुरुषी निवेदनातून ही कादंबरी गतिमान झाली आहे. नवरा गंगाराम याचा हट्टीपणा आणि या गुणाच्या बाबतीत बापाचा वारसा चालविणारा मुलगा भाना यांच्या द्वंद्वात सापडलेली गंगारामची पत्नी पारबती हिच्या आयुष्याचा कसा ‘पाचोळा’ झाला, ते या कथानकातून प्रकर्षाने जाणवते. ‘पाचोळा’ ही जशी शोषित पारबतीची कथा आहे तशी ती तापट, स्वाभिमानी आणि जिद्दी स्वभावाच्या गंगारामचीही कथा आहे. परिस्थितीला शरण न जाता गरडासारख्या सरंजामीवृत्तीच्या शक्तीच्या विरोधात सर्व शक्तीनिशी संघर्ष करतो आणि या संघर्षात गंगाराम आपला विनाश ओढवून घेतो. ‘पाचोळा’ ही एका कारागिराची शोकांतिका आहे. मानवी जीवनातील शोक ही बोराडे यांच्या लेखनामागची प्रवृत्ती आहे. ‘पाचोळा’त स्त्रीजीवनाचे दुःख मोठ्या जोरकसपणे व्यक्त झाले आहे. बोराडे यांनी आत्मप्रतिष्ठेसाठी अस्तित्व पणाला लावणाऱ्या गंगारामाचे जे चित्रण प्रत्ययकारीपणे ‘पाचोळा’त उभे केले आहे, तसे ते अन्यत्र अभावानेच आले असेल.
बोराडे यांच्या एकंदरीत सर्वच लेखनातून ग्रामजीवनाच्या बदलत्या प्रश्नांची आणि स्थितीगतीची नीट ओळख होते. ग्रामीण स्थित्यंतराचा कलात्मक दस्तऐवज म्हणूनही बोराडे यांच्या साहित्याकडे पाहता येऊ शकेल. बोराडे यांनी मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकरी कुटुंबांच्या जीवनाचे तलस्पर्शी चित्रण आपल्या कथाकादंबऱ्यांतून केले आहे. त्यातून या प्रदेशातील रीतीरिवाज, समजुती, सण-समारंभ, वैवाहिक जीवन, स्त्री-पुरुष संबंध, केवळ जगण्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा यांचे हुबेहूब दर्शन घडते. दमनयंत्रणेची शिकार झालेली स्त्रीपात्रे हा बोराडे यांच्या लेखनाचा ठळक विशेष होय.
आपल्या लेखनाबद्दल बोराडे म्हणतात की, सर्जनशील लेखन हा माझा ध्यास आहे, श्वास आहे. ज्या दिवशी माझं लेखन थांबेल त्या दिवशी माझा श्वास थांबेल. यावरून त्यांची साहित्यनिर्मितीवरील निष्ठा दिसून येते.