India Languages, asked by shrutivartak528, 3 months ago

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शालेय
सहलीकरिता विद्यार्थ्यांना प्रवेश दारात सवलत
मिळण्याकरिता व्यवस्थापकांना विनंती करणारे पत्र लिहा​

Answers

Answered by meshramleena705
13

दिनांक: ८ मार्च २०२१ प्रति,

माननीय श्री. गणपत भवरे

व्यवस्थापक-वनश्री,

कारंजा रोड,

वाशिम, ४४४००३

विषय: 'शालेय सहलीकरता विद्यार्थ्यांना | प्रवेशदरात सवलत मिळण्याबाबत.' माननीय महोदय,

| मी स्नेहल ज्ञानसंपदा विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे. माझ्या शाळेतील १० वी च्या वर्गातील ७५ मुले आपल्या वनश्रीमध्ये पर्यटनाकरता येण्यास उत्सुक आहेत. शाळेच्या वतीने आयोजित केलेली ही सहल आम्हां विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच आहे. या सहलीकरताआम्हां विद्यार्थ्यांना प्रवेशदरात सवलत मिळाली, तर या सहलीमध्ये माझ्या आणखी विद्यार्थी | मित्रांना सहभाग नोंदवता येईल. तरी शालेय विद्यार्थी म्हणून आम्हां सर्वांना प्रवेशदरात सवलत मिळावी अशी मी आपणांस विनंती करत आहे.

आपली विश्वासू,

स्नेहल

विद्यार्थी प्रतिनिधी,

ज्ञानसंपदा विद्यालय, | जया निवास विजयगड, विक्रोळी मुंबई, ४०००१९

[email protected]

Similar questions