विविध इतिहासकार यांच्या कार्याची माहिती देणारे सचित्र हस्तलिखित
Answers
Answer:
प्रस्तावना
धुळे येथे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांचे दि. 31 डिसेंबर 1923 रोजी निधन झाले. त्यांची 90 वी पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा घेतलेला आढावा. वि.का राजवाडे हे संशोधक तर होते पण त्यांचे विविध विषयांवर संशोधन होते. इतिहास, गणित, मानववंशशास्त्र, विज्ञान, भौतिकशास्त्र, संस्कृत, भाषाशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली.
आपल्या भारत देशाचा इतिहास सर्वांनीच अभ्यासला पाहिजे. हिमालयापासून खाली कन्याकुमारी तसेच अरबी समुद्र, बंगालचा उपसागर अशी सीमा पाहिली तर या ठिकाणी प्राचीन काळापासून अनेक जाती, पंथ, धर्माची विविध लोक राहतात. आज आम्ही एकसंघ आणि गुण्यागोविंदाने राहात आहोत. प्रत्येकाच्या चालीरिती वेगळ्या, अन्न, पोषाखात वैविध्य आहे पण आम्ही सर्व एक आहोत. हा सर्व इतिहास त्यात प्राचीन मध्ययुगीन आणि अर्वाचीन हा अभ्यासलाच पाहिजे. येथे अनेक थोर पुरुष होऊन गेले. या ठिकाणी इंग्रज आले, मोगल आले, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आले. आमच्या समवेत राहिले. या थोर मायभूमीने सर्वांना सांभाळले. यांचाही इतिहास समजून घेतला पाहिजे.
इतिहासाचा अभ्यास करतांना एक कर्तृत्ववान पुरुष समोर येतो. तो म्हणजे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे होय. 1875 ते 1925-26 या कालखंडात राजवाडे यांनी एक लेख लिहिला. त्यात त्यांनी 1818 ते 1913 या कालखंडातील कर्तृत्ववान पुरुषांची माहिती दिली आहे. राजवाडे यांचे धातुकोष आणि नामादिशब्दयुत्पत्तिकोश हे सन 1937 आणि 1942 मध्ये प्रसिद्ध झाले होते. ते म्हणजे त्यांची आयुष्यभरांची कमाई होती.
ऐतिहासिक खजिना असलेल्या दुर्मिळ ठेव्याचे धुळे येथील इ.वि.का. राजवाडे संशोधन मंडळ
इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे. ज्यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी म्हणजेच धुळे. येथील इ.वि.का. राजवाडे. त्यांना इतिहासाचार्य ही पदवीच दिलेली होती. प्राचीन ऐतिहासिक वस्तू, कागदपत्रे, वास्तू दप्तरखाने, गड, कोट, स्मारके आणि किल्ले ही देशाची महान प्रतिके आहेत. तो देशाचा महान राष्ट्रीय ठेवाच आहे. त्याची जपवणूक हे देशातील प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्यच आहे. असा महान राष्ट्रीय वारसा धुळे येथे राजवाडे संशोधन मंडळात जपला जात आहे. खानदेशच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचे हे मंडळ म्हणजे भूषण आहे. महाराष्ट्रातील इतिहास संशोधनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून इ.वि.का. राजवाडे यांचे नांव पुढे येते.
संशोधन संकलन, संपादन आणि समिक्षण या इतिहासाच्या सर्व टप्प्यात राजवाडे यांचा संचार त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत चालू होता. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात विशिष्ट ध्येयवादाने भरलेली जी पिढी होती त्यामध्ये इ.वि.का. राजवाडे यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य अनेक दृष्टीने इतर महापुरुषांपेक्षा एक वेगळेच होते. त्यांचे लिखाण नवीन विचारांचे खाद्य पुरविणारे आणि आपल्या लोक विलक्षण निष्कर्षांनी समाजाला धक्के देणारे झाले. त्यांचा संशोधनाचा अफाट व्यासंग पाहिल्यावर मन थक्क होते. तनमन ओतून ते संशोधनाकडे वळले.
मराठी भाषा आणि मराठी वाङमय याविषयी त्यांच्या मनात इतिहासाइतकीच जिज्ञासावृत्ती असल्याने राजवाडे यांचे भाषा आणि वाङमय विषयक लेखन अभ्यासकांना ज्ञात नसलेली माहिती देणारे ठरले. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने राजवाडे यांनी 22 खंड प्रसिद्ध केले. संशोधन करतांना राजवाडे यांना ज्ञानेश्वरीची जुनी प्रत सापडल्यानंतर खूप आनंद झाला. या ज्ञानेश्वरीस त्यांनी 100 पानाची प्रस्तावना जोडली. पुढे ज्ञानेश्वरीचे व्याकरण हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. राजवाडे यांच्याजवळ प्रदिप्त प्रतिभा अवर्णनीय नि:स्पृह्ता आणि निरपेक्षता तसेच कष्टशिलता होती. म्हणून त्यांच्याकडून राष्ट्राची उत्तम सेवा झाली.
सन 1864 ते 1926 हा इ.वि.का. राजवाडे यांचा कालखंड सन 1904 पासून ते पुणे येथून धुळे येथे खोलगल्लीतील ॲड.भास्कर वामन भट यांच्याकडे येऊ लागले. इतिहास हे राजवाडे यांचे एक साधन होते. स्वभाषा, स्वधर्म आणि स्वदेश यांच्या रक्षणासाठी ह्या साधनाचा त्यांनी उपयोग केला. पुण्यात सन 1910 मध्ये त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली.
दिनांक 31 डिसेंबर 1926 रोजी धुळे येथे तात्यासाहेब भास्कर वामन भट यांच्या घरी राजवाडे यांचे निधन झाले. लगेचच दिनांक 9 जानेवारी 1927 रोजी धुळे येथील लोकमान्य उद्यानात धुळ्याच्या नागरीकांची जाहीर सभा झाली आणि त्याच दिवशी राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना झाली.
राजवाडे यांचे स्मारक म्हणून राजवाडे संशोधन मंदिर तात्काळ उभारण्याचा ठरावही झाला. दिनांक 27 डिसेंबर 1929 रोजी राजवाडे संशोधन मंदिराची कोनशिला बसविण्यात आली आणि आनंदाची बातमी म्हणजे दिनांक 5 जानेवारी 1932 रोजी राजवाडे मंदिराचे उद्घाटन सौ. महाराणी इंदिराबाई होळकर (मॉ साहेब) यांच्या हस्ते झाले. राजवाडे यांनी गोळा केलेल्या असंख्य दुर्मिळ प्राचीन संस्कृत प्राकृत हस्तलिखित ग्रंथ व ऐतिहासिक कागदपत्राच्या मोठ्या 10 पेट्यांना येथे संग्रहात ठेवण्यात आले. शके 1854 चैत्र शुद्ध 1 एप्रिल 1932 रोजी ‘संशोधक’ या त्रैमासिकाच्या प्रकाशनाला प्रारंभ झाला. श्रीमंत सरदार माधवराव विनायकराव किबे इंदुर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 डिसेंबर 1932 रोजी राजवाडे यांच्या अर्धपुतळ्याचेही उद्घाटन झाले. दिनांक 27 मार्च 1933 रोजी राजवाडे मंडळ पीपल्स को.ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना झाली. दिनांक 30 जानेवारी 1938 रोजी धातुकोश या ग्रंथाचे प्रकाशन झाले. 29 मे 1942 रोजी त्यांच्या नानादिशब्दव्युत्पत्तिकोशाचे प्रकाशन झाले.
1100 आणि 1600 च्या दरम्यान प्रकाशित हस्तलिखिते तयार केली गेली, ज्यात मठ हे त्यांचे सर्वात जुने निर्माते होते. श्रीमंत संरक्षकांना वैयक्तिक लायब्ररींसाठी ही उदाहरणात्मक कामे हवी होती आणि 13व्या आणि 15 व्या शतकादरम्यान फ्रेंच आणि इटालियन शहरांमध्ये भरभराट झालेल्या खाजगी कार्यशाळांच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले.
विविध इतिहासकारांचे सचित्र हस्तलिखित कार्य:-
- सहाव्या शतकातील सेंट ऑगस्टीन गॉस्पेल, आणखी एक प्रकाशित काम, पूर्वीच्या इलियडशी समानता दर्शवते. सेंट ऑगस्टीन गॉस्पेल ही सेंट जेरोमने भाषांतरित केलेल्या चार गॉस्पेलची एक प्रत आहे आणि एकेकाळी पूर्णपणे चित्रित करण्यात आली होती परंतु कालांतराने अनेक तुकडे गमावले आहेत.
- द बुक ऑफ ड्युरो (650-700 CE) - गॉस्पेलचे सर्वात जुने प्रकाशित पुस्तक आयोना किंवा लिंडिसफार्न अॅबे येथे तयार केले गेले. यात अनेक आकर्षक चित्रे समाविष्ट आहेत ज्यात विविध प्राणी गुंफलेल्या जटिल सेल्टिक-नॉट आकृतिबंधांच्या कार्पेट पृष्ठांचा समावेश आहे.
- द ब्लॅक अवर्स (सी. 1475-1480 सीई) - बेल्जियमच्या ब्रुग्समध्ये शहराच्या आघाडीच्या चित्रकार, विल्हेल्म व्रेलंटच्या शैलीत काम करणार्या अज्ञात कलाकाराने तयार केले ज्याने इ.स. 1481 मध्ये त्याचा मृत्यू होईपर्यंत 1450. हे वेल्मचे बनलेले आहे जे काळ्या रंगाचे होते आणि निळ्या आणि सोनेरी रंगात प्रकाशित होते. मजकूर चांदी आणि सोन्याच्या शाईने लिहिलेला आहे. हे सध्याच्या तासांच्या सर्वात अद्वितीय पुस्तकांपैकी एक आहे.
- क्लॉड डी फ्रान्सचे प्रार्थना पुस्तक (सी. १५१७ सीई) - सर्वात अद्वितीय आणि प्रभावी प्रकाशित हस्तलिखितांपैकी एक, हे पुस्तक हाताच्या तळहातावर बसेल इतके लहान आहे आणि तरीही ते 132 चकाचकपणे साकारलेल्या कामांसह सचित्र आहे. सीमा हे छोटे पुस्तक क्लॉड, फ्रान्सची राणी (१५१४-१५२४ सी.ई.) यांच्यासाठी तयार करण्यात आले होते आणि एका कलाकाराने पुस्तक ऑफ अवर्ससह, ही कामे पूर्ण केल्यानंतर, क्लॉड डी फ्रान्सचा मास्टर म्हणून ओळखला जातो.
#SPJ3