Psychology, asked by rajsankpal, 7 months ago

व्यंगचित्र आणि हास्यचित्र यातील फरक
इन marathi​

Answers

Answered by Itscutey
18

Explanation:

व्यंग्यचित्र सभोवतालच्या जीवनातील घडामोडींतील विसंगती नेमकी टिपून त्यावर भाष्य करते. समाजातील रूढ अपप्रवृत्ती, नेत्यांच्या बोलण्यातील आणि वागण्यातील विसंगती, अनेक प्रकारचे भ्रष्टाचार, परिस्थितीमुळे सामान्य माणसाची होणारी कोंडी यांचे मार्मिक दर्शन व्यंग्यचित्र घडवते आणि कधी थट्टामस्करी, तर कधी उपरोध-उपहास यांचा यथोचित उपयोग करून चित्ररसिकाचे प्रबोधन करते. योग्य काय, अयोग्य काय याचे त्याला भान आणून देते. त्याची खिलाडू वृत्ती आणि संवेदनक्षमता वाढवते. काही व्यंग्यचित्रे निखळ, निर्मळ हास्य निर्माण करतात; तर काही हसवताहसवता अंतर्मुख बनवतात. काही उघड संदेश देणारी असतात.

व्यंग्यचित्र हसवणारे असेल किंवा नसेल; पण सुप्त वा उघड आक्रमकता मात्र त्यात जरूर असतेच. आक्रमकता हे व्यंग्यचित्राचे अविभाज्य अंग आहेच, तसेच अनपेक्षित कलाटणी हेदेखील त्याचे आणखी एक वैशिष्ट्य होय.

Similar questions