India Languages, asked by shirishsaklecha2725, 10 months ago

vachan ek prerna essay in marathi

Answers

Answered by kritikharbanda18
1

Answer:

app all do so so so do do Liz

Answered by halamadrid
2

■■वाचन एक प्रेरणा■■

वाचन सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी ठरते.वाचन लेखकाला वेगवेगळ्या विषयांसाठी प्रेरणा तर देतेच,पण त्याचबरोबर इतरांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारे मदत करते.म्हणून प्रत्येकाने वाचनाची सवय लावलीच पाहिजे.वाचनाचे अनेक फायदे आहेत.

वाचनामुळे आपण वास्तविक दुनियेतून एका वेगळ्याच कल्पनारम्य दुनियेत जातो.वाचनामुळे आपल्याला आजूबाजूच्या पर्यावरणाबद्दल माहिती मिळते.आपली कल्पनाशक्ती व सर्जनशीलता वाढते.आपला कंटाळा दूर होतो.

वाचनामुळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा ज्ञान मिळतो.नवीन गोष्टी शिकायला मिळतात.वाचनामुळे आपल्याला संपूर्ण जगाची माहिती मिळते.

वाचनामुळे आपल्याला इतिहासाबद्दल,महापुरुषांबद्दल माहिती मिळते.जुन्या काळाची व पुराणातल्या गोष्टींचे ज्ञान मिळते.वाचनामुळे आपले मन शांत होते.त्यामुळे आपला शब्दसंग्रह सुधारतो व वाढतो.

वाचनामुळे आपली विचार करण्याची क्षमता वाढते.आपली स्मरणशक्ती वाढते.वाचनामुळे आपले आत्मविश्वास वाढते,व्यक्तिमत्व विकसित होते.त्यामुळे आपले लेखन कौशल्य व संवाद कौशल्य सुधारते.

अशा प्रकारे, वाचनाचे खूप सारे फायदे आहेत.त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच वाचनाची सवय लावली पाहिजे.

Similar questions