वन्य विनाशाची कारणे सांगा.
Answers
Answer:
पर्यावरणातील विविधता टिकवून ठेवणे हे वन्य जीवांच्या रक्षणाचे परंपरागत उद्दिष्ट आहे. वन्य जीवांच्या बरोबरीने पृथ्वीतलावर मानव गुण्यागोविंदाने नांदत आला आहे परंतु गेल्या २-३शतकांत माणसाने वन्य जीवांची प्रमाणाबाहेर हत्या केली अन्नासाठी त्यांच्याशी स्पर्धा करू लागला तसेच प्रदूषणामुळे त्यांच्या प्रजोत्पादनास प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली व त्यांच्या राहण्याच्या जागा नष्ट होऊ लागल्या. अशा रीतीने वन्य जीवांना जीवनसंघर्षात टिकून राहणे अवघड झाले, कारण त्यांच्यापुढील या अडचणींवर त्यांना मात करता येणे शक्य नाही. परिणामी पुष्कळ जीवजाती नष्ट किंवा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे जगभराच्या विचारवंतांनी विज्ञानयुगाच्या सुरुवातीस होती तशी विविधता पूर्ण जीवसृष्टी परिरक्षित किंवा पुनःस्थापित करण्याकडे आपले लक्ष वळविले.
विध्वंसक किंवा अनाकर्षक गोष्टींचे परिरक्षण कशासाठीकरावयाचे? याचे साधे व सोपे उत्तर म्हणजे जगात आपल्याभोवती असलेल्या विविधतेमुळे आपल्या आनंदात भर पडत असते, हे होय. घनदाट जंगलात राहणारा वाघ किंवा दक्षिणेकडील शीत महासागरांतील निळा देवमासाही कदाचित आपल्याला प्रत्यक्ष पहावयास मिळणार नाही तथापि त्या भागांत त्यांचे अस्तित्व आहे, या कल्पनेनेच आपल्याला आनंद मिळतो नाहीतर आपण या गोष्टींना मुकलो असतो.
जीवांमधील विविधता टिकविण्याची व्यावहारिक कारणेही अधिक सुस्पष्ट होऊ लागली आहेत. विशिष्ट प्राणी व वनस्पती मग त्या अपरिचित व दुर्लक्षित असल्या, तरी शास्त्रीय व आर्थिक दृष्ट्याअत्यंत महत्त्वाच्या आहेत. काही जीवजाती प्रयोगशाळांमध्ये अत्यावश्यकच झालेल्या आहेत. त्यांच्यामुळे मानवाच्या महत्त्वाच्या शरीरक्रिया वैज्ञानिक प्रक्रियांवर प्रकाश पडला आहे आणि त्यामुळे रोग प्रतिबंध व उपचार यांचा मार्ग सुकर झाला आहे. रानटी बैलासारख्या जातींचा उपयोग करून पशुधनामध्ये नवीन वाणांची पैदास करणे शक्य झाले आहे.