२) वनसंपत्ती आणि वन्यजीव यांचा सहसंबंध आहे.
Answers
Answer:
पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी जीवन (जगणे) शक्य झाले आहे त्या त्या ठिकाणी निसर्गतः वाढत असलेल्या वनस्पतींच्या व वनस्पति-समुदायांच्या कक्षांचे व विशेष वितरणासंबंधीचे (प्रसारासंबंधीचे) सर्व बाजूंनी केलेले व केले जात असलेले अध्ययन व संशोधन यांचे संकलन करणाऱ्या वनस्पतिविज्ञानाच्या एका प्रमुख शाखेला वनस्पति-भूगोल (इं. प्लँट जिऑग्रफी, फायटोजिऑग्रफी, फायटोकोरॉलॉजी, जिओबॉटनी, जिओग्राफिकल बॉटनी इ.) अशी संज्ञा आहे. ह्या वनस्पतींचा विचार नैसर्गिक वर्गीकरणातील जाती, प्रजाती (वंश), कुल यांसारख्या एककांच्या भाषेत करतात अथवा वन, तृणप्रदेश, मरूक्षेत्र इत्यादींसारख्या सामुदायिक एककांच्या भाषेतही करतात. या शाखेत बव्हंशी स्थलीय निसर्गदृश्यापुरतीच (भूदृश्यापुरतीच) मर्यादा कोणी काटेकोरपणे पाळतात तथापि जलवनस्पतींचा अंतर्भावही त्यामध्ये अभिप्रेत आहे, असे अनेक मानतात. ज्याअर्थी परिसरातील जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) व इतर अनेक घटक वनस्पतींचे (आणि प्राण्यांचेही) जीवन नियंत्रित करतात, त्याअर्थी ह्या सर्व घटकांशी संबंधित अशा ⇨परिस्थितिविज्ञान ह्या वनस्पतिविज्ञानाच्या शाखेचा ह्या वनस्पति-भूगोल शाखेशी फार निकट संबंध आहे. कालमानाच्या संदर्भात इतिहासजमा झालेल्या जीवाश्मरूप (शिळारूप) वनस्पतींच्या भूकवचातील वितरणासंबंधीची माहिती येथे विचारात घेण्याचा संकेत पाळला जातो त्यामुळे ⇨पुरावनस्पतिविज्ञान व ⇨पुरापरिस्थितिविज्ञान ह्या शाखांशी येथे संबंध येणे अटळ असते. तसेच वनस्पति-भूगोलाच्या विकासाच्या इतिहासात ⇨क्रमविकास (उत्क्रांती) व ⇨आनुवंशिकी यांच्याही प्रगतीचा फार निकट संबंध आलेला आढळतो त्यामुळे निसर्गेतिहास, परिस्थितिविज्ञान व निवास तंत्रे (वनस्पति-समुदायातील सर्व सजीव व निर्जीव घटकांचे परस्परावलंबी एकत्रित व्यूह) यांचे विश्लेषण यांपासून वनस्पति-भूगोलाचे क्षेत्र सुसंगतपणे अलग ठेवणे अद्याप शक्य झालेले नाही. भूगोल वैज्ञानिकांच्या मते, तर ही शाखा भूगोलविज्ञानाची एक शाखा आहे आणि त्यामुळे ते या शाखेत अधिकाधिक लक्ष घालू लागले आहेत, ही बाब तर्कशुद्ध दिसते. पृथ्वीवरील साधन सामग्रीच्या योग्य व्यवस्थापनात वनस्पति-भूगोलाचा संबंध वाढत असल्यामुळे त्याच्या विस्ताराला अधिक संधी मिळत आहे. वनस्पतींच्या वितरणात दिसून येणाऱ्या व अनुभवास येत असलेल्या वस्तुस्थितीची नोंद करणे व त्यातील कार्यकारणभाव स्पष्ट करणे हे वनस्पति भूगोलाचे प्रमुख कार्य आहे. वनस्पतींच्या वितरणाची महत्त्वाची लक्षणे आणि प्रत्यावर्ती आकृतिबंध निश्चित करणे आणि त्यांची मौलिक कारणे शोधणे हा वनस्पति-भूगोलाचा उद्देश आहे. त्यांच्या जीवनास आवश्यक असलेली परिस्थिती आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यांतील परस्परसंबंध, तसेच त्यांच्या क्रमविकासाचा इतिहास व त्यांचे स्थानांतर इत्यादींत ह्या शोधाची मुळे असतात असे अनुभवास आले आहे
Explanation: