वर्तमान पत्र नसले तर निबंध
Answers
★ वर्तमान पत्र नसते तर -
काल रात्री मला अचानक एक स्वप्न पड़ल. एक भयंकर विचित्र स्वप्न. मी अश्या जगात होतो की तिथे वर्तमान पत्रच नव्हते.
बघा ना, वर्तमान पत्र नसते तर आपल्याला रोजच्या ताज्या बातम्या कुणी पुरवल्या असत्या. अनेक महत्वाच्या घडामोडी आपल्याला कित्येक दिवस, महीने किंवा वर्षही कळल्या नसत्या. अनेक कामच्या जहिराती टाकता आल्या नसत्या. लहान मुलाना छान छान गोष्टी, कविता आणि वृद्धासाठी शब्दकोडे कुठे मिळाले असते.
वर्तमानपत्र नसते तर अनेक काम ठप्प पडली असती. सकाळी चाहा घेताना विचारविनिमयासाठी विषय सुद्धा भेटला नसता. वर्तमानपत्र च्या अभवाचा परिणाम आपल्या दैनंदिन ज्ञानावर झाला असता.
हा विचार करता करता अचानक धाडकन आवाज आला. आईच्या हातातून पडलेल्या ग्लास चा आवाज ऐकून मी जागा झालो आणि स्वप्न अधुरेच राहिले.
ही गोष्ट स्वप्नात आली हेच पुरेस आहे. कधी प्रत्यक्षात नको घडायला...
धन्यवाद.
वर्तमान पत्र नाव समोर येताच एक दहा ते बारा पानांचा समूह डोळ्यासमोर येतो. ज्याला आपण बालपणापासून बघत आलो आहोत. वर्तमान पत्रात येणाऱ्या पुरवण्या ज्या प्रत्येक दिवसाला काही वेगळ सांगून जातात, या पुरवण्या प्रत्येकालाच वाचायला आवडतात. परंतु जर हीच वर्तमान पत्र बंद झाली तर, हा विचार देखील मनाला हलवून जातो. जर वृत्तपत्र बंद झाली तर आपल्याला प्रत्येक सकाळी मिळणारी नवनवीन माहिती कशी मिळणार. आपल्या दिवसाची सुरुवात जी याच वर्तमानपत्राने होत असते ती कुठेतरी थांबल्यासारखी वाटेल.
वृत्तपत्रे नसतील तर विविध प्रकारच्या जाहिरातींचा आपल्यावर होणारा मारा थांबेल. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे कथन कोण करेल ? प्रतिस्पर्धेच्या या युगात आपण खूप मागे राहून जाऊ. वर्तमान पत्र बंद म्हटली की वाचनालय बंद पडतील जी लोकं सुट्टीच्या दिवशी वाचनालयात जाऊन आपला वाचनाचा छंद जोपासत असतात त्यांना त्यांच्या छंद दूर करावा लागेल. एवढेच नव्हे तर देशातील साक्षरता दर देखील कमी होईल.