Geography, asked by bhanupratap111980, 1 year ago

vibhanga Vividh Prakar spasht Kara in Marathi​

Answers

Answered by jitekumar4201
0

विभंग, खडकांतील : खडकांतील ज्या भंगाच्या (भेगेच्या किंवा तड्याच्या) लगतचे पृष्ठभाग एकमेकांच्या सापेक्ष विस्थापित झालेले (सरकलेले) असतात, अशा भंगाला विभंग म्हणतात. ताण निर्माण करणाऱ्या  अथवा संपीडक दाब देणाऱ्या प्रेरणांमुळे भंग निर्माण होतो व त्याच्या विरुद्ध बाजूंचे खडक एकमेकांच्या संदर्भात विस्थापित होतात.

विभंग ओळखण्याचे निकष व स्थाननिश्चिती : विभंग विविध प्रकारे ओळखता येतात. कड्यावरचा अथवा रस्ता बांधताना व खाण खोदताना उघड्या पडलेल्या भागावर विभंग सहज दिसतो आणि त्याची उंची, विस्थापन इ. पुष्कळ अचूकपणे कळू शकते. भूवैज्ञानिक नकाशे तयार करण्याच्या पद्धतीच्या साहाय्याने विभंग लक्षात येतात. उदा., नकाशातील छाटले गेलेले, खंडित किंवा विस्कळीत झालेले शैलसमूह विभंग सूचित करतात व त्यांवरून विभंगाचा मागही काढता येतो.

उच्च नतीचे विभंग : यांना गुरुत्वीय किंवा सामान्य विभंग म्हणतात. [आ.१(अ)]. गुरुत्वीय विभंगात उपरिभित्ती ही आधारभित्तीच्या सापेक्ष खाली सरकलेली असते. या विभंगांवरून भूकवचाची लांबी वाढल्याचे सूचित होते. भूकवचाची लांबी वाढल्याने उदग्र संपीडन (दाबण्याची क्रिया) होऊन हे विभंग निर्माण होत असावेत.

प्रणोद विभंग : व्युत्क्रमी विभंग असेही म्हणतात. प्रणोद विभंगात उपरिभित्ती आधारभित्तीच्या सापेक्ष वर सरकलेली दिसते (आ. ३) याचा कोन सामान्यपणे ४५ अंशांपेक्षा कमी असतो. यात भूकवचाचे आकुंचन होऊन संपीडन प्रेरणा निर्माण झाल्याचे सूचित होते.

नतिलंब-सरक विभंग : यामधील विस्थापन हे मुख्यत्वे नतिलंबाला समांतर दिशेत झालेले असते म्हणजे खडकांचे ठोकळे नतीला नव्हे तर नतिलंबाला अनुसरून अधिक विस्थापित झालेले असतात (आ.४). परिणामी ते उभ्या दिशेत थोडेच आणि आडव्या दिशेत खूपच जास्त सरकलेले असतात.

संक्रामी विभंग : नतिलंब-सरक विभंगाचा मोठ्या क्षेत्रांवर आढळणारा हा खास प्रकार म्हणता येईल. यात उदग्र विभंगपृष्ठाला अनुसरून पार्श्वीय (बाजूच्या दिशेत) विस्थापन होते. मध्यमहासागरी पर्वतरांगांलगत (उदा., अटलांटिक महासागरातील तळावर) खचदरीसारखी विभंग क्षेत्रे आढळतात. या क्षेत्रांतून शिलारस वर येतो.

भूकंप व विभंग : सर्व नव्हे, तर बहुसंख्य भूकंप विभंगाला अनुसरून होणाऱ्या जलद हालचालींद्वारे (विस्थापनांद्वारे) होतात. कारण विभंगाच्या क्षेत्रांत अचानक हालचाल झाली की, भूकंपाचे धक्के बसतात.

Similar questions