vidya hech dhan essay in marathi
Answers
Hope my answer helps you
MARK MY ANSWER AS BRAINLIST !!!
■■विद्या हेच धन■■
विद्या असे धन आहे, ज्याचा उपयोग आयुष्यभर केला जाऊ शकतो.आपल्याला हवे तितके ज्ञान आपण मिळवू शकतो, कोणत्याही वयात शिक्षण घेता येते. विद्या प्राप्त करण्यासाठी कोणतीही मर्यादा नसते.
विद्येने आपल्याला चांगल्या व वाईट गोष्टीत फरक करता येते. आपण चांगली मानवीय मूल्ये शिकतो. समाजात कसे वावरायला हवे हे आपल्याला विद्येमुळे कळते.आपण प्राप्त केलेल्या विद्येने आपल्याला कठीण परिस्थितींमध्ये मार्ग शोधता येतो.
विद्या आपल्याला समाजात मान मिळवून देते. एका ज्ञानी व्यक्तीला एका श्रीमंत व्यक्तीपेक्षा समाजात जास्त आदर मिळतो.
विद्येमुळे आपली विचार करण्याची क्षमता वाढते,भविष्यातील पुढील वाटचालीसाठी आपण तयार होतो.आपला आत्मविश्वास वाढतो, आपण आत्मनिर्भर बनतो.
विद्येमुळे आपली सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ति वाढते.विद्येमुळेच आपण जीवनात यश मिळू शकते.
खरंच, विद्या हेच सर्वश्रेष्ठ धन आहे.