India Languages, asked by 1212qureshi, 1 year ago

Viram chin in marathi subject

Answers

Answered by nandu6286
3

hope its help you plz mark the brainlist answer

Attachments:
Answered by halamadrid
1

●विरामचिन्ह : विरामचिन्हांचा मराठी व्याकरणात खूप महत्व आहे. यांच्या उपयोगाने वाचन करताना आपल्याला कळते की आपल्याला कधी थांबायचे आहे, किती वेळ थांबायचे आहे.यांच्या वापराणे वाक्य स्पष्ट होतात.

◆मराठीत विरामचिन्हांचे प्रकार आहेतः

१. पूर्णविराम : हे चिन्ह वाक्य पूर्ण झाले आहे, हे दाखवण्यासाठी वापरले जाते.

उदाहरण : मोहन हॉकी खेळतो.

२. अर्धविराम : जेव्हा दोन वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात, तेव्हा हे चिन्ह वापरतात.

उदाहरण : राहुल हुशार आहे; पण अभ्यासात त्याचे लक्ष नाही.

३. स्वल्पविराम : संबोधनाचा वापर केल्यावर किंवा एका लागोपाठ शब्द आल्यास हे चिन्ह वापरले जाते.

उदाहरण : गोपाल, सुरेश आणि दर्शन बाहेर गेले आहेत.

४. अपूर्णविराम : वाक्याच्या शेवटी जर तपशील द्यायचे असेल, तर हे चिन्ह वापरले जाते.

उदाहरण : परीक्षेत उत्तीर्ण झालेली आहेतः राम,रमेश,राकेश आणि स्नेहा.

५. प्रश्नार्थक चिन्ह : हे चिन्ह प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी वापरले जाते.

उदाहरण : रमेश, तू कुठे आहेस?

६. उद्गारवाचक चिन्ह : हे चिन्ह भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी लावले जाते.

उदाहरण : बापरे! किती मोठी इमारत.

७. एकेरी अवतरण चिन्ह - हे चिन्ह एखाद्या शब्दावर जोर द्यायचे असल्यास वापरले जाते.

उदाहरण : त्या जागेचे नाव 'रामपुर' आहे.

८. दुहेरी अवतरण चिन्ह - वाक्यात जो बोलत आहे, त्याचे शब्द दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते.

उदाहरण : राम म्हणाला,"मी उद्या येणार नाही".

९. संयोग चिन्ह - या चिन्हाचा प्रयोग दोन शब्द जोडण्यासाठी केला जातो.

उदाहरण : त्यांनी प्रेम- विवाह केला.

१०. अपसारण चिन्ह : हे चिन्ह स्पष्टीकरण द्यायचे असल्यास वापरले जाते.

उदाहरण : तो चोर- ज्याने अनेक चोऱ्या केल्या- पकडला गेला आहे.

Similar questions