Vyanga Chitra ya vishaya var mahiti
Answers
- The disease vyanga is a type of kshudra kustha (group of skin disorder), mentioned in Ayurveda. It may manifests with various sign and symptoms like mandalam visrijati (circular lesion), nirujatanuka (painless thin lesion), shyava (dark brown color lesion over skin) in face.
Vyanga Chitra ya vishaya var mahiti
प्रस्तावना
समकालीन व्यक्ती-घटना-प्रसंगात दडलेल्या विसंगत स्वरूपाच्या अर्थाचे म्हणजे सूचितार्थाचे हास्यजनक प्रकटीकरण करणारे चित्र. व्यंगचित्र हे पाहताक्षणीच हसविणारे व त्यासोबत उपरोधिक मार्मिक भाष्य जाणवून देणारे असते. कार्टूनचा इंग्रजीतील मूळ अर्थ संकल्पित चित्राचे सम आकारातील प्राथमिक चित्ररेखाटन होय; पण १८४३ मध्ये या शब्दाला चित्रमय विडंबन असा एक वेगळाच अर्थ एका गमतीदार प्रसंगातून जोडला गेला. त्या सुमाराम इंग्लंडमध्ये बांधल्या जात असलेल्या पार्लमेंट हाउसच्या लांबरुंद भिंती भित्तिचित्रांनी सजवाव्यात व त्यासाठीची चित्रे चित्रकारांची स्पर्धा लावून त्यांमधून निवडावीत, असे तत्कालीन व्हिक्टोरिया राणीचा पती प्रिन्स अॅल्बर्ट याने ठरविले; पण (स्पर्धेसाठी आलेली) कार्टून्स (त्यावेळचा अर्थ) हास्यास्पद वाटावीत एवढी सुमार निघाली. या प्रकाराची खिल्ली उडवण्यासाठी त्यावेळी नुकत्याच निघालेल्या पंच साप्ताहिकाने (१८४१) पंचची कार्टून्स म्हणून व्यंग्यचित्र-मालिका प्रसिद्ध केली. त्यामध्ये जॉन लीच (१८१७–६४) या चित्रकाराचे कार्टून नं.१ या शीर्षकाखाली एक चित्र होते. लांबरुंद भिंतीवर श्रीमंत, ऐषारामी राजे-उमरावांची अनेक व्यक्तिचित्रे लावली आहेत आणि समोर भुकेकंगाल, फाटक्या कपड्यांतील तळागाळातले लोक (अगदी सहकुटुंब, सहपरिवार) प्रेक्षक म्हणून आले आहेत असे दाखवून भपक्यावर अनावश्यक खर्च करणार्या. राजाची जनतेबद्दलची निष्ठुर बेफिकीरी सूचित केली होती. तेव्हापासून ‘कार्टून’ला सध्याचा ‘व्यंगचित्र’ हा नवा अर्थ चिकटला. मराठीमध्ये प्रत्यक्ष वापरात मात्र ‘व्यंगचित्र’ असाच शब्द रूढ झाला आहे.