English, asked by ni3phoenix, 8 months ago

What is 'samas vigrah'.....in Marathi???​

Answers

Answered by grewalSaab
3

Answer:

काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो. बर्‍याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.

उदा.

वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव.

पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट

कांदेपोहे – कांदे घालून तयार केलेले पोहे.

पंचवटी – पाच वडांचा समूह

समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.

1. अव्ययीभाव समास

2. तत्पुरुष समास

3. व्दंव्द समास

4. बहुव्रीही समास

Answered by gunsagargawai077
3

Answer:

here is your ans

Explanation:

शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात.व तयार होणार्या शब्दास सामासिक शब्द म्हणतात, या शब्दांची फोड करून दाखविण्यास विग्रह असे म्हणतात. समासात दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात. ( सम + अस = एकत्र होणे )

समासाचे प्रमुख चार प्रकार पडतात.

1)अव्ययी भाव समास (प्रथम पद प्रधान )

2)तत्पुरुष समास:

अ )विभक्ती तत्पुरुष

आ )अलुक तत्पुरुष

इ)उपपद तत्पुरुष

ई)नत्र तत्पुरुष

उ )कर्म धारय

ऊ )द्विगु

ए )मध्यम पदलोपी

3)द्वंद्व समास:

अ)इतरेतर द्वंद्व

आ)वैकल्पिक द्वंद्व

इ)संहार द्वंद्व

4)बहुर्वीही समास:

अ)विभक्ती बहुर्वीही:

1)समानाधिकरण बहुर्वीही

2)व्याधीकरण बहुर्वीही:

आ)नत्र बहुर्वीही

इ)सहबहुर्वीही

ई)प्रादिबहुर्वीही

If its help full to you then please follow

me

and

Make me Brainlist.

Similar questions