Hindi, asked by shahsanjay2912, 1 year ago

Why is marathi language is important essay in marathi?

Answers

Answered by preetsingh375
4

Answer:

निबंध भाषण • मराठी माझी आवडती मराठी भाषा निबंध, भाषण, लेख, महत्व मराठी मध्ये – Essay on the Marathi Language in Marathi by Sueniel2019-03-01 Marathi schools generally give essay or speech assignment on topics like Majhi Aai, My favorite Animal, My school and other topics (You can check such list here – मराठी निबंध विषय) but one topic which is “Essay on the Marathi Language” itself is not that common (but it should be). Here are trying to give information on the Marathi language, its history, and its importance in Marathi itself. We wrote this introduction in English because we believe in all languages. Every language has its own importance and place. We should respect others if we want respect in return. But as Marathi people, we should be proud of our own native language; it’s a beautiful language. माझी आवडती मराठी भाषा निबंध, भाषण, लेख (Speech, Essay on the Marathi Language) मराठी हि एक खूप सुंदर भाषा आहे जी मुख्यता महाराष्ट्रात आणि थोड्या प्रमाणात गोवा इथे बोलली जाते. मराठी हि भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी भाषा हि भारतात सगळ्यात जास्त बोलली जाणारी चौथी भाषा आहे. मराठीच्या तश्या ४ मुख्य पोटभाषा आहेत,त्या म्हणजे वऱ्हाडी, कोळी, मालवणी आणि कोंकणी. मराठी भाषा २००० वर्षांपासून अस्तित्वात आहे, म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न चालू आहे. मराठी भाषेचा इतिहास (History of the Marathi Language) मराठी भाषा हि इंडो-आर्यन कुटुंबातील मानली जाते. साताऱ्यामध्ये सापडलेले तांब्याचे शिलालेख ७९५ सी.ई. चे मानले जातात. असेच काही शिलालेख रायगड जिल्ह्यातील अक्षी तालुक्यात सापडले जे १०१२ सी.ई. चे मानले जातात. दिवे इथे सापडलेले जमीन व्यवहाराचे तांब्याचे शिलालेख हे १०६० किंवा १०८६ सी.ई. चे आहेत. याचा अर्थ असा कि मराठी हि १२व्या शतकापर्यंत एक अधिकृत लिखित भाषा झाली होती. यादव काळ ११८७ सी.ई. नंतर यादव काळात मराठीचा वापर वाढला. यादव राजे अगोदर कन्नड आणि संस्कृत भाषा वापरत असत. १४ व्य शतकाच्या शेवटी पर्यंत मराठी वर्णलेखनाची प्रमुख भाषा झाली होती. असे मानले जाते कि यादवांनी मराठीला प्राधान्य दिले कारण ते मराठी बोलणाऱ्या प्रजेशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करत होते. पुढे मराठी भाषेचा प्रसार महानुभाव आणि वारकरी पंथांमुळे झाला. यांनी आपल्या धर्माचा आणि शिकवणीचा प्रसार करण्यासाठी मराठीचा उपयोग केला. सेउण राज्याच्या काळात मराठी भाषा न्यायालयात सुद्धा वापरली जाऊ लागली. यादव राजवटीतील शेवटच्या तीन राज्यांच्या काळात ज्योतिष, आयुर्वेद, पुराण, वेदांत वर मराठी साहित्य गद्य आणि काव्य रूपात तयार करण्यात आले.

Continue reading at माझी आवडती मराठी भाषा निबंध, भाषण, लेख, महत्व मराठी मध्ये – Essay on the Marathi Language in Marathi | TeenAtHeart

Answered by till57
5

✯ᴀɴsᴡᴇʀ✯

‘अरे यार, आज मूव्ही देखते है’, ‘ओय, एक्झाम जवळ येतेय…आता स्टडी मस्ट आहे’ ही वाक्यं ऐकल्यासारखी वाटतायत ना? रोजच्या बोलण्यात ही हिंग्लिश-मिंग्लिश कानांवर पडते. असं असलं, तरी मायबोलीविषयी तरुणाईला तेवढंच प्रेम आहे.

‘मराठी बोलण्याची लाज का वाटते?’ हा प्रश्न ‘मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने ‘मुंबई टाइम्स’ने युवा कट्टावर चर्चेला घेतला. या जिव्हाळ्याच्या विषयावर प्रतिक्रियांचा महापूरच आला. ‘होय, आमच्याकडून मराठी भाषेवर अन्याय होतोय’, हे प्रांजळपणे मान्य करण्याचं धाडसही तरुण-तरुणींनी दाखवलं आहे. या प्रातिनिधिक प्रतिक्रियांमध्ये तरुणाई म्हणते, की घरापासून शाळा-कॉलेजपर्यंत सारे संस्कार इंग्रजीमध्ये. त्यामुळे मराठी भाषेशी नातं जोडलंच जात नाही. आमच्या मनावर बिंबवलं गेलं की ते इंग्रजीचंच महत्त्व. पण आता आपली मातृभाषा जोपासण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करू, असा संकल्पही तरुणाईने

सोडला आहे.

खरंच हे दिवस महाराष्ट्रात आहेत का? मातृभाषा आहे म्हणून मराठीचं कौतुक आहेच. पण बऱ्याचदा अस होतं की मुलं मराठी कुटुंबातून आलेली असली तरी त्यांच्यावर इंग्रजीचा प्रभाव जास्त असतो. अगदी उलट परिस्थिती जेव्हा इतर भाषिक लोक एकत्र येतात तेव्हा असते. तेव्हा खंत वाटते की, आपलं आपल्या मातीशी नातं तुटतंय का? महाराष्ट्राच्या मातीशी असलेले घट्ट ऋणानुबंध टिकवून ठेवणारी आपली मातृभाषा आहे. जिचा गोडवा अवीट आहे, जिने राष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कारविजेते लेखक-कवी घडवले, जिने बॉलीवूडकरांनाही भुरळ घातली ती भाषा बोलण्यात कमीपणा वाटण्याचं कारणच नाही. दुसऱ्याची वाट न पाहता स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. तसंच कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळांची व्याप्ती वाढली पाहिजे. जर जास्तीत जास्त मराठी साहित्य जनमानसांत पोहोचलं, तर मराठी केवळ कागदापूर्तीच मर्यादित न राहता सगळ्यांच्या मनामनात राहील.

कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त्य २७ फेब्रुवारी मराठी दिन म्हणून साजरा केला जात असला तरी ते सगळं एका दिवसापुरतंच असतं. नंतर पहिले पाढे पंचावन्न अशी आपल्या सगळ्यांची अवस्था होते. 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा', ही कविता फक्त वाचण्या आणि ऐकण्यापूर्तीच उरली आहे. 'मराठी पाऊल पडते पुढे' हे गाणं आहे तेवढ्यापुरतंच चांगलं पण आज मराठी पावलं मागे पडत आहेत. मराठी भाषेसाठी काही ठोस पाऊलं नाही उचलली गेली तर मराठी भाषा इतिहासात जमा होईल. त्यामुळे मराठी भाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे. त्याशिवाय उपाय नाही. पुढील काही ओळी माझ्या माय मराठीची महती सांगणाऱ्या

मराठी आहे आपली शान

चला वाढवू तिचा मान

मराठी आहे आपल्या श्वासात

ठेऊ तिला जीवनाच्या ध्यासात

हिंदी इंग्रजी आहे भविष्याच्या गरजा

त्यात कमी न होऊ देऊ मराठीचा दर्जा

धरणीच्या पोटातून जिचा उगम झाला त्या मराठी मायबोलीचा सर्वांना विसर पडावा, तिची लाज वाटावी ही खरं तर खंताची बाब आहे. मला वाटतं मराठी भाषेची लाज वाटण्यासोबतच तिचा विस्मरण अधिक होत चालला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचा वाढता प्रभाव आणि आजच्या स्पर्धेच्या जगात मराठीला मिळत असलेले दुय्यम स्थान तसंच बदलती जीवनशैली आणि मराठी शाळेची घसरणारी संख्या या सर्वांमुळे मराठी भाषा व्यवहारात कमी येते आणि मग त्याला पर्याय म्हणून इतर भाषांचा वापर केला जातो. महाराष्ट्रात राहाणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे. जागतिक व्यासपीठावर तिचा उल्लेख, कौतुक झालंच पाहिजे तरच मराठीला योग्य तो दर्जा मिळेल.

Similar questions