India Languages, asked by Anonymous, 3 months ago

Will you please tell me the answer.

in marathi​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

नमस्कार बालकहो,

मी शाळा बोलतेय, हो तुमची शाळाच बोलतेय... अस अनोळखी होवून पाहू नका. खरच मी तुमची शाळा बोलतेय, ओळखलत नाही का मला? पण मी मात्र ओळखते तुम्हाला... आता बरेचसे चेहरे बदललेत.... ज्या बालवयात मी तुम्हाला पाहिलं होत... ते चेहरे बदलले. तुम्ही मोठे झालात, आपापल्या संसारात रमलात. मी मात्र आहे तशीच गावच्या मध्यभागी... तरीही एकाकी.... पण मी बदलले नाही... आहे तशीच आहे. थोडा बदल झाला माझ्यात, तुमाच्यातल्याच एकाने हात दिला मला मदतीचा. आणि मी पूर्वी पेक्षा एका माळ्याने, मजल्याने

वाढले फक्त.... आपलं संपुष्टात येणार अस्तित्व

टिकवण्यासाठी.

पण मला आजही आनंदच वाटतो... मी एकाकी कसली हो....!

अजिबात नाही. वाटलं होत कि तुम्ही माझ्या अंगणात वाढलात, शिकलात, पडलात, रडलात आन घड्लात ही... अगदी तशीच तुमची मुल ही माझी पायरी चढतील. माझ्या अंगणात बगडतील. पण नाही... कदाचित हे माझ दुर्भाग्य असावं. वाईट या गोष्टीच वाट्त की, तुम्ही माझ्या बाजूने जातानाही अभिमानाने आपल्या मुलांना सांगत ही नाही की, बाळा ही माझीशाळा... मी या इथे शिकलो, इथे घडलो... चल तुला मी माझी शाळा दाखवतो... अस बोलला असतात तरी माझ समाधान झाल असत. मी तृप्त झाले असते.

असो, हा माझ्या दुर्भाग्याचा विषय... पण अजूनही वेळ गेली नाही. आजही तुमच्या भावाची, काकाची, नातवाची, पुतण्याची, बहिणीची मुले माझ्या अंगणात घड्तायत... मोठी होतायत, खूप हुशारही आहेत. विविध क्षेत्रात पारंगत आहेत. त्याना मी तुमची मुले... तुमचच रूप समजते.

आजच्या तंत्रज्ञानाने प्रगत... नव्या युगात तुम्ही मात्र आधुनिक होत गेलात. पण मी मात्र परतीच्या पावलासारखी दोन पावले मागेच राहिले. माझ्याकडे या नव्या आणि आधुनिक जगात... त्यांना देण्यासारख काहीच नाही. तेच जुने पुराने बाक, उघड अंगण, माझ्या भिंतीही आता जुनाड आन ढिसाळ दिसू लागल्यात, ना सभागृह, ना लघुशंकेसाठी सुसज्ज व्यवस्था, मुलांच्या प्राथमिक गरजाच मी पूर्ण करू शकत नाही. तर आधुनिक पद्दतीच शिक्षण कस देवू शकेन?. हे पाहून मलाच माझी खंत वाटतेय

माझ्या या अवस्थेला आज जबाबदार कोण? तुम्हीच सांगा मी कुणाकडे बोट दाखवू. तुमच्यासाठी येथेसांगा मी कुणाकडे बोट दाखवू. तुमच्यासाठी येथे राबतेय, तुम्हास घडवतेय, सावरतेय अस आपलं आई मुलाच नातं... मला आधार देण्यास तुम्ही का नाही पुढे येत? का नाही खुलवत पुन्हा येथे नंदनवन...?

बाळांनो, मी आज तुम्हास साद घालतेय.... या परतुनी पुन्हा.... अस काहीतरी करा कि तुमची मुलं माझ्या अंगाखांद्यावर बागडतील, तुम्ही शहरात नाही तर इथे रहाल. माझ्या समोर. माझे बनून...

खूप वाईट वाटतय की माझीच काही मूलं माझ्या समोरून आपल्या मुलाच्या पाठीवर दप्तर टाकून बाहेरच्या शाळेत पाठवतात. तेंव्हा ज्या काही वेदना होतात त्या माझ्या मलाच ठावूक.

का तुम्हाला मी आवडत नाही ? कि तुमच्या योग्यतेची मी आता उरली नाही.?

मी बदलायला तयार आहे. पण माझ्यात तो बदल तुम्ही घडवा.

करा मला आधुनिक.... द्या माझे वैभव पुन्हा मला. उठा एक व्हा...! आणि घडावा पुन्हा.... तो इतिहास जो तुमच्या वडीलधारयांनी नी घडवला. मला तुमच्या गावात आणली.... तुमच्या सेवेसाठी.

मी खूप आशेने तुमच्याकडे पाहत आहे. उठा आणि संघटीत व्हा...! मी दयेची याचना करतेय. घडवा पुन्हा आयुष्य तुमच्या पाल्यांच जे आज माझ्या अंगणातशिकतायत. मला पहायचय की माझा विद्यार्थी हा गाव सोडून शहरात नाही तर गावात राहून मोठा झालेला. शिकून मोठा अधिकारी झालेला, डॉक्टर, कलेक्टर झालेला.

मला पहायचय...

मला पहायचंय... जे गेल्या अनेक वर्षात घडलं नाही ते पहायचंय

पदर पसरते तुम्हासमोर... माझी एवढी इच्छा पूर्ण करा. माझी एवढी इच्छा पूर्ण करा. निघते

आता खूप उशीर झालाय.

तुम्हालाही तुमची कामं आहेत, तुम्हालाही तुमच विश्व आहे,

तुम्हालाही तुमचा सुखा समाधानाचा संसार आहे. निरोप घेते आता...। खरच उशीर झालाय.

चलते.... चलते...आता माझा निरोप घ्या... पुन्हा मला

भेटण्यासाठी...

Answered by SujalBendre
1

Answer:

Shaleche Manogat Nibandh In Marathi

नुकत्याच सुट्ट्या संपून शाळा भरली. सर्व मुले एकमेकांना सुट्टीमधील गमतीजमती सांगण्यात मग्न झाले होते.

सगळ्यांना आनंद झाला होता आणि सगळ्यांसोबत मलाही आनंद झाला होता.

मी शाळा बोलतीये. माझे नाव … आहे.

खूप दिवस माझे वर्ग बंद होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांचा गोंधळ नाही, शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन ऐकायला मिळाले नाही, प्रार्थना नाही पूर्ण शांतता.

परंतु आता मात्र मी पूर्ण भरभरून गेले आहे. प्रार्थना ऐकून माझ्यात उत्साह निर्माण होतो.

शाळेत आल्यावर दंगा, मस्ती करणारी लहान मुले जेव्हा प्रार्थनेसाठी एकदम शिस्तीचे पालन करून प्रार्थना म्हणतात हे पाहून खूप छान वाटते.

तुमच्या अभ्यासाच्या वेळेतून तुम्ही माझ्यासाठी थोडासा वेळ काढून माझ्या अंगणातील स्वच्छता करून माझी निगा राखता हे तर माझ्यासाठी न विसरणारी गोष्ट आहे.

कचरा होऊ नये म्हणून माझ्या प्रत्येक कक्षेत कचरा पेटीचे केलेले नियोजन खूप छान आहे.

वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही यश मिळवून माझ्या काक्ष्यांमधून तसेच माझ्या परिसरामधून आनंदाने मिरवता तेव्हा मलाही तुमच्याबद्दल अभिमान वाटतो.

पावलोपावली तुम्हाला मिळणारे यश मी पाहत असते.“Shaleche Manogat Nibandh In Marathi “

वार्षिक परीक्षा, चाचणी परीक्षा, शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्टही मी पाहिले आहे.

दुपारच्या सुट्टीमध्ये झाडांच्या सावलीमध्ये जेव्हा तुम्ही सर्वजण एकत्रीतपणने गप्पा मारत जेवण करता हे पाहून माझे मन भरून जाते.

महत्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याची टाकी सर्वांची तहान भागवत असते. स्वच्छतागृह असल्यामुळे स्वच्छतेचे पालन खूप चांगल्या प्रकारे होते.

शाळेचे मनोगत निबंध मराठी

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला जमलेली गर्दी व त्या दिवशीचे आयोजित केले जाणारे कार्यक्रम खूप छान असतात.

शाळेची तपासणी असेन तर मला सजवले जाते. माझ्या वर्गांना रंग देऊन छान कसे दिसतील हे पहिले जाते.

वर्गांमधील फलकांवर छान छान सुविचार लिहून चांगले विचार दिले जातात. पताका लावल्या जातात.

परंतु कधी कधी वाईट वाटते काही जण माझी काळजी खूप काळजी घेतात आणि काही जण माझ्या भिंतींवर नको त्या रेषा ओढून भिंती खराब करतात.

वर्गांमधील बाकांची काळजी घेतली जात नाही. वर्गांमध्ये ठेवलेल्या कचरपेटीचा वापर न करता कचरा इतरत्र टाकतात.

विध्यार्थी माझ्या वर्गात बसून भरपूर ज्ञान मिळऊन पुढे जाऊन यश मिळवतात.

ह्या वर्षी माझे वर्ग वाढवण्यात आले. नवनवीन बाकांची संख्या वाढवण्यात आली. हे सर्व पाहून मला आनंद झाला.

मी नेहमी तुमच्यासाठी व पुढील येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी अशीच आनंदात उभी राहील.

Don't worry me nahi leave karnar aane ho maje kasle nakshatra palat ?? ek vicharu aapn final exam nantar bolu ya ka , mind khup divert hote mhnun.

Similar questions