India Languages, asked by prajwalchaudhari, 3 months ago

write a essay for shivaji maharaj in marathi​

Answers

Answered by rahultelam816
3

Explanation:

shivaji maharaj jayanti nibandh

महत्‍वाचे मुद्दे :

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे वापरू शकता. )

शिवाजी महाराजांचा आगळेपणा

स्वराज्यस्थापनेचा उद्देश

त्यात आलेल्या अडचणी

स्वराज्याची व्यवस्था

व्यक्तिमत्वाचे विविध पैलू

प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या मते प्राचीन काळापासून जे जे श्रेष्ठ राजे भारतवर्षात होऊन गेले त्या सर्वांमध्ये श्री शिवाजी महाराज एक आगळे वेगळे होते. कारण त्या राजांच्या मृत्यूनंतर त्यांचे राज्य नष्ट झाले. परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राज्याच्या रक्षणासाठी मराठे लढले. त्यांनी राज्याचे रक्षण केले.

प्रतिकूल राजकीय परिस्थितीत कोणीही नेता नसताना मराठी फौज लढत राहिली. कारण त्यांना ते 'शिवाजी महाराजांचे राज्य' असे कधीच वाटले नाही. त्यांनी ते राज्य स्वतःचे मानले. अशी घटनाच देशाच्या इतिहासात अनोखी व एकमेव होती.

जनतेच्या मनातील स्वातंत्र्याकांक्षेचे शिवाजीमहाराज प्रतिनिधी होते. 'लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नाही.'एका सामान्य जहागिरदाराच्या मुलाने मोगल बादशाहीला आव्हान देणे म्हणजे सामान्य बाब नव्हे.

खरोखर ‘स्वत:च्या हिंमतीवर, समोर कोणी मार्गदर्शक नसताना मध्ययुगीन भारतात नवीन रस्ता बांधून दाखवणारे ते कल्पक पुरुष होते,' स्वराज्य स्थापन करताना जीवाला जीव देणारे साथी-सोबती त्यांनी निर्माण केले. स्वराज्य स्थापन करताना त्यांच्यापुढे कठीण अडचणी आल्या. संकटांचे महापूर आले. परंतु ते हरहुन्नरी, निधड्या छातीचे, गंभीर, योजक, प्रसंगावधानी लोकनायक होते. त्यामुळे अफजलखानाची भेट असो, की शाहिस्तेखानावर छापा असो, किंवा आग्ऱ्याची नजरकैद असो, ते सर्व प्रसंगांतून सहीसलामत सुटले.

शिवाजीमहाराजांचे राज्य स्वत:चे राज्य नव्हते. प्रजेचे राज्य होते. ते राज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. 'श्रीमान योगी' होते. आपले शौर्य विसरून गेलेल्या किंवा पायाखाली तुडविल्या गेलेल्या व आत्मविश्वास गमावून बसलेल्या, मृतप्राय समाजाला शुद्धीवर आणायचे, वर मान करून आपल्या हीनदीनतेस कारणीभूत झालेल्या परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध दंड थोपटून राहण्याचे सामर्थ्य त्यांनी निर्माण केले.

शिवाजीमहाराज व्यवहारी होते. आपल्याला रक्षण करता येईल एवढेच राज्य त्यांनी वाढवले. राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वराज्याच्या कारभाराची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याला, समाजाला व राज्यसंस्थेला 'शाप' ठरलेली वतनदारी पद्धत त्यांनी बंद केली. साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीत विस्कळीत झालेला समाज सूत्रबद्ध, शिस्तबद्ध, उच्च महत्त्वाकांक्षी, कर्तबगार. स्वाभिमानी व स्वराज्यनिष्ठ बनविण्यासाठी महाराज कष्ट घेत होते.

महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला, ठेकेदारी, सावकारी, दलाली हे तिन्ही व्यवसाय त्यांनी बंद केले. ते धर्मरक्षक होते व क्रांतिकारकही होते. त्यांचा धर्माभिमान औरंगजेबासारखा नव्हता. ते परधर्मसहिष्णु होते. उदारमतवादी होते.

सर्व धर्मांना, मतांना, आचारांना त्यांचे सादर व सप्रेम संरक्षण होते. आग्ऱ्याच्या नजरकैदेत असताना त्यांचा अंगरक्षक 'मदारी मेहतर' होता. तो महाराजांचा विश्वासू सेवक होता. प्रजेला अत्यंत शुद्ध समतोल, स्वस्त व जलद न्याय मिळण्याची सर्व व्यवस्था महाराजांनी केली.

रोख आर्थिक व्यवहार अमलात आणून सरंजामशाही मोडून काढणारा हा पहिलाच राजा. लष्करी कारभाराची व्यवस्था त्यांनी तशीच डोळसपणे आखली.

स्वत:चे त्यांचे चारित्र्य निष्कलंक, स्वच्छ होते. शुद्ध मन, सद्भावना व सरळ स्वभाव हे त्यांचे विशेष. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. प्रजेच्या सुखाचा विचार करणारा व दुःखाचा नाश करणारा हा लोक-नायक होता. खऱ्या अर्थाने हा रयतेचा राजा होता. त्यांच्या सद्गुणांचा वारसा मराठी मनाला व मराठी लोकांना लाभला आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Answered by RedCream28
19

Answer:

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केल. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात.[ संदर्भ हवा ] शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख 'शिवशंभू' असा होतो.

सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म (१६३०) ते औरंगजेबाचा मृत्यू (१७०७) ह्या ७७ वर्षांच्या काळास इतिहासकार ‘शिवकाल’ असे म्हणतात.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : "छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला."

Similar questions