India Languages, asked by janhavi5350, 1 year ago

Write a essay on my birthday (maza vadhdivas) in marathi.
↑↑↑
please do not copy from google.
and in marathi only please←←←

Answers

Answered by Hansika4871
1

*माझा वाढदिवस*

३० मे १९९७ रोजी माझा जन्म मुंबईत झाला. आई बाबा आजी आजोबा खूप खुश होते. कधी हे एक वर्ष संपले आणि माझा पहिला वाढदिवस आला हे मला समजलं पण नाही (अर्थात तेव्हा आपण लहान होतो व सगळ्या गोष्टी समजत नसतात) माझ्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो बघताना मला आठवत नाही त्या गोष्टी पण बघून कौतुक वाटते. लहानपणी भेट म्हणून मला खूप खेळण्या व कपडे मिळाले होते. आई बाबांनी एक तीन चाकी सायकल भेट दिली होती व आमच्या समाजाचा मोठा सभागृह बुक करण्यात आला होता. मोठ्या दादा ताईनी सजावट खूप सुंदर केली होती आणि मोठा केक होता. माझा पहिला वाढदिवस हा खूप भव्य झाला.

त्या नंतर आम्ही कांदिवली मध्ये स्ताईत झालो. माझे बऱ्येच वाढदिवस साजरे केले. माझे सगळे शाळेतील व बिल्डिंग मधले मित्र मैत्रिणी घरी येत. बाबांनी १० वाढदिवस करायचा ठरवला. आजी आजोबा, काका काकी, मामा मामी हे दोन दिवसांपूर्वी माझ्या घरी राहायला आले. मोठ्या दादांनी सगळ्यांना निमंत्रण दिले. ताईने घराचे सगळे डेकोरेशन व सजावटीची जबाबदारी घेतली. आईने तिच्या मैत्रिणीला गाडीच्या आकाराचा केक बनवायची ऑर्डर दिली. आणि केकचा फ्लेवर होता माझा आवडतं चॉकलेट. यंदा 30 मे रविवार असल्यामुळे सगळ्यांनाच सुट्टी होती व म्हणूनच एक दिवसापूर्वी शनिवारी मी माझा वाढदिवस शाळेत साजरा केला. शाळेत सगळ्यांना चॉकलेट वाटले. 29 चा रात्री बारा वाजता एक छोटा केक कापला.

30 तारखेला सकाळी सकाळी मी आजोबांसोबत देवळात गेलो. तिकडे पाया पडून, घरी येऊन आईने चमचामित जेवण केले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास माझी बिल्डिंग मधले आणि शाळेतील मित्र घरी आले. आम्ही केक कापण्याचा पूर्वी भरपूर गेम्स खेळलो. संध्याकाळी सात वाजता केक कापला व आईने सगळ्यांना बटाट्याचे वेफर्स केक आणि चॉकलेट वाटले. आजी-आजोबांनी माझ्यासाठी एक मोठी रिमोटची गाडी आणली होती. राहुल ने पुस्तकाचा सेट, तर कमलेश ने मला एक नोवेल दिले. काकूंनी गीत मोठी गियर वाली सायकल दिली. सध्या मित्र-मैत्रिणींसाठी मी रिटर्न गिफ्ट आणले होते. रिटर्न गिफ्ट मध्ये एक वही, कलर्स आणि पेन चा सेट होता.

रात्रीच्या जेवणात पावभाजी होती आणि त्यासोबतच चॉकलेट आईस्क्रीम. एकंदरीत खूप मजा आली व माझा दिवस खूप आनंदात गेला.

Similar questions