India Languages, asked by yogisrinivas991, 1 year ago

Write a letter to your friend inviting him to your home for ganesh chaturthi in marathi

Answers

Answered by bestanswers
16

प्रिय सुमेध,

कसा आहेस ? तुझं कॉलेज कसं चाललंय ? आम्ही मुंबईहून नागपूरला येऊन आता जवळजवळ १० महिने होत आले. पण मला अजूनही मुंबईची आणि आपल्या सगळ्या मित्रांची आठवण  येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही गणेश चतुर्थी साजरी करणार आहोत. तुला आणि तुझ्या कुटुंबियांना आग्रहाचं आमंत्रण आहे. मी आकाश आणि सुनीललाही बोलावणार आहे. तूही नक्की ये. कोणतीही सबब सांगून येणं टाळू नकोस. मी वाट बघतोय.  

पाच दिवस आपण सगळे मिळून मुंबईसारखी इथेही धमाल करू. तुम्ही इथे आलात की आपण  नागपुरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरायलाही जाऊ.  

तुम्ही सगळे सहकुटुंब आलात तर मला आणि माझ्या आई बाबांनाही आनंद होईल.  

सगळेच तुमची आतुरतेने वाट बघत आहोत.  

तुझाच,

अमेय.

Similar questions