English, asked by raghunathkhatri4098, 11 months ago

write essay on republic in day in marathi

Answers

Answered by Mandar17
7

२६ जानेवारी हा दिवस “प्रजासत्ताक दिवस” म्हणुन साजरा केला जातो .26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली आणि आपला देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र झाला. ह्या दिवशी सर्व शाळा , महाविद्यालये ,सरकारी कार्यालये इत्यादि ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सगळ्यात जास्त कुतूहल असते ते शालेय विद्यार्थ्यांना. याचे कारण काहीसे वेगळे आहे .या दिवशी त्याना सकाळी थोडं लवकरच उठावं लागते आणि शाळेत जावे लागते .मग झेंडावंदनाची सर्व तयारी झाल्यानंतर जवळपास सकाळी साडेसात च्या सुमारास झेंडावंदन आटोपलं जाते. या नंतर मान्यवर लोकांची भाषणे होतात देशसेवेचे संदेश विद्यार्थ्यांना देतात. मग परेड ,सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा यांचे आयोजन केलेलं असते. बक्षिस वितरण,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  देखील याच दिवशी केलं जाते. मग वेळ येते ती कार्यक्रमाची सांगता करण्याची. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करुन हा कार्यक्रम जवळपास बारा वाजता संपवला जातो. मग काय उरलेला दिवस मुलांना सुट्टी प्रमाणे घालवता येतो असा असतो २६ जानेवारी चा दिवस! धन्यवाद.

Similar questions