write the डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत (Darwin's theory of natural selection)in marathi
Answers
Answer:
I hope it is clear my head head head head head head head 7
चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने पुढे 'सक्षम ते जगतील' असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिदधीस दिला.(डार्विन याने त्यासाठी ‘ओरीजीन आफ स्पेसीज' (Origin of species) हे पुस्तकही प्रसिदध केले) याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो, सर्व जीव प्रचंड सख्येने पुनरुत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात जी अक्षरश: जीवघेणी असते. या स्पर्धेत जो जीव जिकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो, तोच तगून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्त्वाची ठरते कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात) जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत (Theory of Natural selection) बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे पण नंतर त्यातही काही बाबींबद्दल आक्षेप घेतले गेले आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे,
1. नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही.
2. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही.
3. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगड ठरले.