write the essay of my sister in marathi
Answers
माझी ताई
माझी ताई हा माझा आदर्श आहे. मी आता सहावीत आहे, तर ताई अकरावीत आहे. गेल्या वर्षी दहावीत तिने उत्तम गुण मिळवले. आता ती विज्ञान शाखेचा अभ्यास करत आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे. मला खात्री आहे, ती उत्तम डॉक्टर होईल. दुसऱ्यांची सेवा करणे तिला खूप आवडते.
माझे आईबाबा दोघेही नोकरी करतात. त्यामुळे ताईला घरात खूप काम करावे लागते. ती घर व्यवस्थित ठेवते. आईबाबांना आलेले निरोप घेऊन ठेवते. ती माझ्याकडून अभ्यास करवून घेते. मला वेळच्या वेळी खाऊ घालते. ही सगळी कामे ताई न कंटाळता करते. कचेरीच्या कामासाठी काही वेळेला आईला बाहेरगावी जावे लागते, तेव्हा माझी ताईच सर्व घर सांभाळते.
ताई शाळेत सर्वांची लाडकी विदयार्थिनी होती. शाळेच्या अनेक कार्यक्रमांत ती भाग घेत असे. शाळेच्या नियतकालिकात तिचा लेख असे. ताईला खूप मैत्रिणी आहेत. माझ्या ताईची मी लाडकी बहीण आहे.
Answer:
hey mate here is your answer ☺️☺️❤️❤️
माझी बहिण खूप चांगली आहे। आमचं कितीही भांडण झाल तर आम्ही एका-मेकी शिवाय राहू शकत नाही। आमच प्रेम खूप दाट आहे। आम्ही नेहमी एकामेकाला मदत करण्यासाठी तत्पर असतो। माझी बहिण माझ्यासाठी खूप चांगली आणि मार्गदर्शिका आहे। मी आणि माझी बहीण ला कोणीही वेगळा करू शकत नाहीत।
hope it helps you
insta id for chat or follow - harsh barote
##maharashtrian boy