Chemistry, asked by Anonymous, 10 months ago

write the essay on the असा हा पाऊस!in Marathi in short paragraph ​

Answers

Answered by xShreex
1

\large\boxed{\fcolorbox{blue}{yellow}{Answer:-}}

असा हा पाऊस!

पाऊस मला खूप आवडतो. तो आपल्याकडे फक्त चार महिन्यांकरिता पाहुणा म्हणून येतो. तेवढ्या काळातही त्याचा लहरीपणा अनुभवावा लागतो. कधी तो शहाण्या मलासारखा अगदी वेळेवर येतो, तर कधी सर्वांना खूप वाट पाहावयास लावतो! कधी तो जरासे तोंड दाखवतो आणि लगेच आपले तोंड काळे करतो! अशा वेळी सर्वांच्या तोंडचे पाणी पळते!

या पावसाची रूपे तरी किती विविध! ते सर्व त्याचे नखरे असतात. कधी तो मुसळधार कोसळतो, या भूमातेला थंडगार करतो आणि मग गायब होतो. तर कधी हा दिवसरात्र रिमझिम पडत राहतो. कधी हा एवढा चेकाळतो की, धुवाधार कोसळतच राहतो आणि सर्वांना सळो की पळो करतो!

असे असले, तरी हा पाऊस सर्वांना हवाहवासा वाटतो. कारण तो सर्वांना जीवन देतो. पाऊस पडतो म्हणून नदया, विहिरी, झरे यांना पाणी येते. शेते पिकतात. झाडे, फळे, फुले यांना बहर येतो आणि सर्वांच्या जगण्यात चैतन्य येते.

Similar questions