write the information about the twins in marathi
Answers
गर्भाशयामध्ये एकाच वेळी दोन भ्रूणाची वाढ होऊन दोन अपत्ये जन्मास येतात. अशा अपत्यांना जुळी अपत्ये म्हणतात. अनेक दाम्पत्यांना जुळी अपत्ये होतात. जुळ्या अपत्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत- एकयुग्मजी जुळे आणि दिवयुग्मजी जुळे.
_एकयुग्मजी जुळी अपत्ये एकाच युग्मनजापासून तयार होतात. भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये (युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत) त्यातील पेशी अचानक दोन गटांमध्ये विभागल्या जातात.
भ्रूणपशीचे दोन्ही गट दोन वेगळे-वेगळे भ्रूण म्हणून वाढू लागतात आणि पूर्ण वाढ होऊन एकयुग्मजी जुळे जन्माला येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखीच असतात. त्यामुळे ही अपत्ये दिसण्यास तंतोतंत सारखीच असतात व त्यांचे लिंग समानच असते, म्हणजेच दोन्ही मुली असतील किंवा मुले असतील.
एकयुग्मजी जुळ्यांबाबत भ्रूणपेशींची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसांनंतर झाली तर सायामिज जुळे (Siamese / Conjoined twins) जन्माला येण्याची शक्यता जास्त असते. अशी जुळी अपत्ये शरीराच्या काही भागांत एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत जन्माला येतात. अशा जुळ्यांमध्ये काही अवयव सामायिक असतात.
अपवादात्मकरित्या स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी दोन अंडपेशी बाहेर पडतात आणि दोन वेगवेगळ्या शुक्राणुंद्वारे त्या फलित होऊन दोन युग्मनज (Zygotes) तयार होतात. या दोन्ही युग्मजांपासून दोन भ्रूण तयार होऊन दोन्हींचे गर्भाशयात रोपण होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर दिवयुग्मजी जुळी अपत्ये जन्माला येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात आणि लैंगिकदृष्ट्या समान किंवा वेगवेगळी असू शकतात.