१.यांनी पोर्तुगिजांचा पराभव केला.
Answers
Answer:
इतिहास संपादन करा
इ.स. १४९७ साली पोर्तुगालचा राजा इमॅन्युअलने आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली. या मोहिमेची जबाबदारी त्याने पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा याच्यावर सोपवली. चार जहाजे आणि एकशे सत्तर प्रशिक्षित खलाशी घेऊन वास्को द गामा मोहिमेवर निघाला. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने दक्षिणेच्या टोकापर्यंत तो गेला. या दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला त्याने 'केप ऑफ स्टॉर्म्स' असे नाव दिले. पुढे पोर्तुगालने ते बदलून 'केप ऑफ गुड होप'असे केले. त्यानंतर वास्को द गामा आफ्रिकेच्या पूर्व किनार्याने मोझांबिक येथे आला. त्यावेळी मोझांबिक हे प्रगत बंदर होते व तिथे मिलिंद या राजाचे शासन होते. या बंदरात वास्को द गामाला काही भारतीय जहाजे नांगरलेली दिसली. त्या जहाजावरील अब्दुल माजिद नावाच्या एका भारतीय खलाशाची मदत घेऊन अरबी समुद्रातून प्रवास करीत वास्को द गामा भारताच्या मलबार किनाऱ्यावर पोहोचला. कालिकतपासून उत्तरेला सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या कप्पड या लहानशा खेड्यात त्याने १७ मे, इ.स. १४९८ रोजी नांगर टाकला व त्यानंतर तीन दिवसांनी तो त्याची जहाजे घेऊन कालिकत बंदरात आला. या मोहिमेमुळे युरोपकडून भारताकडे थेट येणाऱ्या नवीन सागरी मार्गाचा शोध पोर्तुगालच्या या दर्यावर्दीने लावला.
कालिकतचे हिंदू राज्य प्राचीन चेरा साम्राज्याच्या अकरा वारसा राज्यांपैकी एक होते. वास्को द गामा कालिकतला आला त्यावेळी तिथला शासक नेडीयिरुप्पू स्वरूपम 'झामोरीन' या त्याच्या आनुवांशिक बिरुदावलीने ओळखला जात होता. झामोरीनच्या राज्यातील कालिकत हे बंदर असलेले शहर मसाल्याच्या व कापडाच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. सागरी व्यापारामुळे समृद्ध असलेल्या कालिकतचे झामोरीन हे सार्वभौम शासक होते व त्यांनी जवळजवळ आठ शतके त्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखलेले होते. त्यांनी दिल्लीच्या मुघल प्रभुत्वाला कधीही मान्यता दिलेली नव्हती. ते त्यांच्या आदरातिथ्य, धार्मिक सहिष्णुता आणि सर्व देशांच्या व्यापार्यांना आश्रय देण्याबद्दल प्रसिद्ध होते. परकीय व्यापाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत व दलालांसमवेत राहता यावे म्हणून झामोरीनच्या प्रभावक्षेत्रातील समुद्रकिनारपट्टीवर त्यांना अनेक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.
Explanation:
Please mark me as brainliest
Explanation:
फोटो तो क्या प्रभाव कोणी केला