१. यंत्र आमचा मित्र की शत्रू? niband |
Answers
Explanation:
आजच्या युगात यंत्रांचे खूप महत्व आहे.आपण जवळजवळ प्रत्येक कामासाठी कोणते न कोणते यंत्र वापरत असतो.
यंत्रांचे अनेक फायदे आहेत.त्यांचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये आणि घरगुती कामांसाठी केला जातो. त्यांच्यामुळे आपल्या वेळेची बचत होते, काम लवकर होते, कमी मेहनत करावी लागते.यंत्रांमुळे कठीण कामसुद्धा सोप्या पद्धतिने करता येते,त्यामुळे मोठ्या प्रमाणात एखाद्या वस्तूचे उत्पादन करता येते.आजच्या काळात टीव्ही,मोबाइल,संंगणक,वॉशिंग मशीन,एसी आणि इतर उपकरणांशिवाय जीवनाचा विचार करणे खूप कठीण आहे.
पण, यंत्रांचे काही तोटेदेखील आहेत.कामासाठी यंत्रांचा वापर केल्यामुळे,अकुशल कामगारांना नोकरी गमवायला लागते.यंत्रावर कामासाठी अवलंबून असल्यामुळे शरीराचा व्यायाम होत नाही व त्यामुळे आपल्याला विविध आजार होतात.मनोरंजनासाठी यंत्रांवर अवलंबून राहिल्यामुळे आपण निसर्गाच्या आणि नातेवाईकांच्या सहवासात राहिल्या विसरलो आहोत. यंत्रांच्या अतिवाप्रामुळे पर्यावरण आणि प्राण्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.काही लोक यंत्रांचा दुरुपयोग करून सामाजिक हिंसा,खोट्या बातम्या पसरवून लोकांच्या मनात भीती निर्माण करतात.
अशा प्रकारे,यंत्रांचा योग्य प्रकारे उपयोग केला तर ते आपले मित्र व त्यांचा दुरूपयोग किंवा अतिवापर केल्यास, ते आपले वैरी ठरू शकतात