या वर्षी तुमच्या सोसायटीत साजरा
झालेल्या गणेशोत्सवाचा वृतांत लिहा
Answers
Answer:
कोरोनाच्या काळात यावर्षी राज्य शासनाच्या आणि विविध महापालिकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करून घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा आहे. गणेशोत्सवासाठीच्या काही विशेष सूचना मुंबई आणि पुणे महापालिकेने दिल्या आहेत.
येत्या 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. घरगुती गणेश मूर्ती या बहुतेकदा आदल्या रात्री किंवा प्रतिष्ठापनेच्या दिवशी सकाळी घरी नेल्या जातात. पण यावर्षी कोव्हिड 19च्या साथीमुळे गर्दी टाळणे आवश्यक असल्याने गणेश मूर्ती चतुर्थीच्या 3 ते 4 दिवस आधीच नेण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. याशिवाय गर्दी टाळून विसर्जन करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष नियम केले आहेत.
गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे नियम
मुंबई महापालिका क्षेत्रांतल्या 70 नैसर्गिक विसर्जन स्थळांसोबतच यावर्षी 167 कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले आहेत. कृत्रिम तलावांची ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा पाच पट अधिक आहे.
मुंबई महापालिका विभाग पातळीवरची 'फिरती गणेशमूर्ती संकलन केंद्र' सुरू करेल.
नैसर्गिक वा कृत्रिम विसर्जन स्थळांपासून 1 ते 2 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्यांनाचा याठिकाणी विसर्जन करता येईल. इथेही नागरिकांना थेट विसर्जनस्थळावर जाता येणार नाही. लोकांना या विसर्जन स्थळाजवळ मूर्ती जमा कराव्या लागतील आणि नंतर महापालिकेतर्फे या सगळ्या मूर्तींचं विसर्जन करण्यात येईल.
नैसर्गिक वा कृत्रिम विसर्जन स्थळांपासून दूर असणाऱ्यांसाठी महापालिकेचे विभाग संकलन केंद्रं सुरू करतील. इथे जमा करण्यात आलेल्या मूर्तींचंही पालिकेतर्फे विसर्जन केलं जाईल.
कंटेनमेंट झोनमध्ये सोसायटीच्या आवारात तात्पुरती विसर्जनस्थळ तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
विसर्जनासाठी जाताना मूर्तीची पूजा, आरती ही प्रक्रिया घरीच करावी असं आवाहान मुंबई महापालिकेने केलंय. शिवाय मूर्ती विसर्जनासाठी जमा करताना सोशल डिस्टंन्सिंग पाळावं, गर्दी करू नये असंही मुंबई महापालिकेने सांगितलं आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयांबद्दल नगरसेवकांमध्ये दुमत असल्याने मंगळवारी दुपारी पुन्हा काही मुद्द्यांबाबत बैठक होणार आहे.
गणपतीसाठी पुणे महापालिकेच्या सूचना
कोव्हिड 19ची साथ लक्षात घेत नागरिकांनी घरीच गणेशमूर्तीचं विसर्जन करावं, असं आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं होतं. घरच्या घरी विसर्जन करणं सोपं जावं यासाठी शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं असंही पुणे महापालिकेने म्हटलं होतं.
घरच्या घरी गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी पुणे महापालिकेकडून सोडियम बायकार्बोनेट मोफत पुरवण्यात येणार आहे. मूर्ती विक्रेते, प्रभागातील आरोग्य केंद्र व क्षेत्रीय कार्यालयाचे ठिकाणी सोडीयम बायकार्बोनेट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार पुण्याच्या महापौरांनी सांगितलंय.
याशिवाय ज्या नागरिकांना मूर्तीचं दान करायचं असेल त्यांच्यासाठी पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात व्यवस्था करण्यात येणार आहे.
ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे अशा नागरिकांसाठी प्रत्येक विभागात एका फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनासाठी यावर्षी मिरवणूक काढता येणार नाही. मंडळांनी त्यांच्या मंडपाशेजारीच कृत्रिम हौदाची निर्मिती करून त्यात गणपतीचं विसर्जन करावं.
याशिवाय सार्वजनिक गणपतीच्या आगमनाच्या वेळी मिरवणूक काढता येणार नाही, ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मंदिरे आहेत, त्यांनी यावर्षी गणपतीची प्रतिष्ठापना मंदीरात करावी.
गणपतीची पूजा आणि आरतीसाठी जास्तीत जास्त 5 व्यक्तींनाच हजर राहता येईल, आणि या गणपतीचं ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक वा वेबसाईटवरून दर्शन देण्याची सोय सार्वजनिक मंडळांनी उपलब्ध करून द्यावी असं पुणे महापालिकेने सांगितलं आहे.
कोकणात गणपतीला कसं जाता येईल?
कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारने काही नियम जाहीर केले आहेत. याशिवाय एसटी आणि मध्य आणि पश्चिम रेल्वे सोडत असलेल्या विशेष गाड्यांनीही भाविकांना कोकणात जाता येणार आहे.