यशवंतराव चौहान मुक्त विद्यापीठ बीए भाग 1 मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम
Answers
Answer:
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
शैक्षणिक विकास आणि पुनर्रचनेचा महाराष्ट्राला फोर मोठा वारसा आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या थोर विचारवंतांचे या राज्यातील शैक्षणिक विकासाच्या चळवळीत मोठे योगदान आहे. याच परंपरेला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या विधीमंडळाने १ जुलै १९८९ रोजी विशेष कायदा क्रमांक २० अन्वये या विद्यापीठाची स्थापना करून त्यास महाराष्ट्राचे थोर नेते व आधुनिक महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिले.
कायदा क्रमांक २०(१९८९) ने प्राप्त करून दिलेल्या वैधानिक दर्जामुळे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिल्या मुळे या विद्यापीठास विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक अशा पातळीवरील शिक्षणक्रम उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. शिक्षांक्रम विकसित करण्यापासून परीक्षा घेण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर उत्तम काळजी घेतल्यामुळे शिक्षणक्रमांचा दर्जा राखणे शक्य झाले आहे. या शिक्षणक्रमांचे विकसन अशा प्रकारे करण्यात आले आहे की ते अन्य विद्यापीठांशी समकक्षता राखू शकतील, तसेच प्रमाणपत्र दर्जाचे काही असे स्वतंत्र शिक्षणक्रम विकसित करण्यात आले आहेत की ते अन्य विद्यापीठांत उपलब्ध नाहीत. या स्तरावरील शिक्षणक्रमाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यास तो उत्तीर्ण झाल्या बरोबर दिले जाते. त्यासाठी पदवीप्रदान कार्यक्