India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

अंधश्रद्धा या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
9

अंधश्रद्धा ही आपल्या भारतीय समाजात पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक सामाजिक समस्या होय. अंधश्रद्धेमुळे अनेक पशुपक्षी, प्राणी तसेच निरपराध माणसांचा बळी गेलेला आहे. मंत्र-तंत्र, नरबळी, भूतप्रेत, पिशाच्च इत्यादीसंबंधी अफवा पसरवून जनसामान्यांमध्ये भीती निर्माण करणे व तशीच कृती करणे हे अंधश्रद्धेचे उदाहरण आहे. यामुळे निष्पाप जिवांचा बळी पडलेला आहे.  अशिक्षितपणामुळे अंधश्रद्धेचा पगडा वाढलेला आहे. साधी एखादी मांजर रस्त्याने आडवी गेली की अपशकुन होतो असे म्हणतात, पण हे पूर्णतः अंधश्रद्धा आहे. ग्रहणाच्या दिवशी काही कापू नये, ग्रहण पाहू नये, हे सर्व यातच मोडल्या जाते. अंधश्रद्धा जर पुरनतः नष्ट झाली तरच मनुष्य खऱ्या अर्थाने बुद्धिवादी बनेल. आंध्रश्रद्धा नको तर प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा असावी तरच जीवन सुलभ होईल.

Answered by Anonymous
10

Answer:

कोकणातील एका खेड्यात नुकतीच घडलेली एक घटना. झाडे लावल्यावर आठ वर्ष उलटली तरी आंबे लागले नाहीत. म्हणून त्या शेतकऱ्याने एक यज्ञ करून बकऱ्याचा बळी दिला. अशीच गाजलेली दुसरी एक घटना. गुप्त धन मिळावे म्हणून एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून स्वत:च्या पोटच्या लहान मुलीला बळी देण्याची एक खेडूत तयारी करत असताना पोलिसांनी त्याला पकडले. अशा या घटनांनी मन उद्विग्न बनते. जग एकविसाव्या शतकात शिरलेले असताना आपल्या समाजात हे असे भयानक प्रकार का घडत आहेत?

हे या अंधश्रद्धेने आपल्या देशाचा घात केला आहे. प्रगतीच्या मार्गात फार मोठे शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा. या बाबतीत सध्या खूप संशोधनही झाले आहे. त्याचा उपयोग करून, खतपाणी घालून पीक सकस व जास्त कसे येईल, हे पाहिले पाहिजे. या मानिच देशाची प्रगती होईल. पण तसे घडत नाही. आजारातून बरे व्हावे म्हणून किंवा परीक्षेत यश मिळावे म्हणून गंडेदोरे बांधणारे कमी आढळत नाहीत. गंड्यादोयांनी शरीरातील रोगजंतू मरत नाहीत किंवा परीक्षेतील प्रश्नांची उत्तरेही लिहिता येत नाहीत. तरीही लोक गंड्यादोग्यांच्या मागे धावतात. अशाने त्यांच्या आयुष्यातील दुःखे नष्ट होत नाहीत, संकटे दूर होत नाहीत, अडचणी संपत नाहीत. उलट, त्यात भरच पडते. मग असे लोक नशिबाला दोष देत गप्प बसतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यात प्रगती होत नाही. आपला समाज मागेच राहतो. अशी ही अंधश्रद्धा म्हणजे आपल्याला मिळालेला फार मोठा शाप आहे. या शापातून मुक्त होण्यासाठी, अंधश्रद्धा नाहीशी करण्यासाठी आपल्याला नेटाने प्रयत्न करायला हवेत. आपले प्रयत्न यशस्वी व्हायचे असतील, तर प्रथम आपल्याला अंधश्रद्धा म्हणजे काय, हे समजून घ्यावे लागेल. अंधश्रद्धा म्हणजे काय, हे स्पष्टपणे कळले तरच तो नष्ट करणे शक्य होणार आहे. म्हणून अंधश्रद्धा म्हणजे काय, हे आधी आपण समजून घेऊ.

या जगात घडणाऱ्या घटना या विशिष्ट निसर्गनियमाने घडतात. निसर्गनियमांविरुद्ध कोणीही काहीही करू शकत नाही. उदाहरणार्थ, पाण्याला उष्णता दिली की विशिष्ट तापमानानंतर पाण्याची वाफ होते, हा निसर्गनियम आहे. हा नियम कोणीही बदलू शकत नाही. कोणत्याही जातिधर्माच्या माणसाने कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी पाण्याला उष्णता दिली तर पाण्याची वाफ होणारच, त्याचे बर्फ होणार नाही. पाण्याला उष्णता न देता केवळ मंत्राने पाण्याची वाफ करतो, असे एखादा म्हणाला तर ते थोतांड असते, हे नक्कीच ! असे असतानाही एखादयाकडे ही शक्ती आहे, तो उष्णतेशिवाय पाण्याची वाफ करू शकतो, असे आपण मानू लागलो, तशी श्रद्धा बाळगली तर ती अंधश्रद्धा ठरेल. मांजर आडवे गेल्याने काम होत नसेल, तर ही घटना जगभर सर्व माणसांच्या बाबतीत अशीच घडली पाहिजे. ती तशी घडत नाही. म्हणजे तो निसर्गनियम नव्हे. म्हणून ती अंधश्रद्धा ठरते. आपण आता आपली विचारपद्धतीच बदलली पाहिजे. प्रत्येक घटनेमागील कारण आपण शोधले पाहिजे. स्वत:च्या बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. अशी वृत्ती आपण जोपासली तरच आपल्याला प्रगती करता येईल.

Similar questions