अण्णाभाऊ साठे यांच्यावर निबंध लिहा
Answers
Answered by
5
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व, त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे . त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या खेड्यात झाला. एक मराठी साहित्यिक, लोककवी, लेखक, समाजसुधारक व शाहीर म्हणून अण्णाभाऊ साठे सर्वांनाच प्रचलित आहे. फक्त दीड दिवस शाळेत गेलेली अण्णाभाऊ यांनी ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या जवळपास ३०० कथा लिहिल्यात. त्यांचे साहित्य मराठी भाषेपुरतेच मर्यादित न राहता इतर चौदा भारतीय भाषेत तसेच रशियन, जर्मन, इंग्रजी इत्यादी परकीय भाषेत भाषांतरित झाले आहे. त्यांच्या लिखाणाने सर्व महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतातील वाचन प्रेमींना वेड लावले. अशा या महान लोकशाहीर साहित्यकाचे निधन १९६९ रोजी झाले. तरीही ते आज जनसामान्यांच्या मनात जागा करून आहेत.
Similar questions
Math,
7 months ago
India Languages,
1 year ago
Math,
1 year ago
History,
1 year ago
History,
1 year ago