आई संपावर गेली तर निबंध
Answers
sorry dear I can't write her because it is a long essay but
hope you like the answer which is sent by me ...
Please mark as branilist
◆◆आई संपावर गेली तर...!!!◆◆
आई नाश्ता तैयार झाला का? आई माझे पुस्तक कुठे आहे? आई माझे कपड़े कुठे आहेत? आई माझे घड्याळ पाहिले का कुठे? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण आईवर आपल्या कामांसाठी अवलंबून असतो. आपल्या जीवनातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती आपली आई जर संपावर गेली तर काय होईल?
आईला मी माझ्या जीवनातील दररोज घडणाऱ्या सगळ्या गोष्टी,माझ्या मनातील गोष्टी सांगते,तेव्हा मला बरे वाटते. जर ती संपावर गेली तर, मी माझ्या मनातील गोष्टी कोणाला सांगणार?
आई माझ्यासाठी छान जेवण बनवते. माझे आवडीचे पदार्थ मला खाऊ घालते. जर ती संपावर गेली तर,माझ्यासाठी उत्तम जेवण कोण बनवणार.
आई माझे खूप लाड करते. माझ्या प्रत्येक गोष्टीकडे तिचे लक्ष असते. ती मला कोणत्याही गोष्टीची कमी होऊ देत नाही. अशा वेळी,ती संपावर गेली तर, माझे लाड कोण करणार?माझी काळजी कोण घेणार?
नको नको!!आई कधीच संपावर जाऊ नये.