History, asked by bsaiuttejteja3720, 1 year ago

आपल्या परिसरातील ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी शिक्षकांच्या मदतीने
वारसा मुशाफिरी आयोजित करा.

Answers

Answered by ChiragMeher
3
chirag Meher

नागरी शास्त्र, इतिहासाच्या अभ्यासकांनी आपलावारसा जपला पाहिजे. वास्तूची माहिती पुस्तिकाफोल्डरच्या स्वरूपात दिली पाहिजे. राजकीय नेते, स्वयंसेवी संस्थांनी ऐतिहासिक वास्तू दत्तक घेऊनत्याचे संरक्षण केले पाहिजे. ऐतिहासिकवारशाजवळ अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात होतात  ती न होऊ देता त्या वारशाचे जतन केले पाहिजे. ऐतिहासिक वारशाची पडझड होत असल्यासराज्य पुरातत्त्व, केंद्रीय पुरातत्त्व व स्वयंसेवीसंस्थांच्या मदतीने त्याचे संवर्धन करण्याचीजबाबदारी पार पाडावी. उपाययोजना आपणकाळजीपूर्वक केल्या तर आपला ऐतिहासिकवारसा राहील; अन्यथा येणाऱ्या काळामध्येआपल्याला त्या वास्तूचा फोटो पाहून किंवा येथेचही वास्तू होती असे पुढच्या पिढीला सांगावे लागेल.

हिंदुस्थान हा विविधतेने नटलेला आहे. सर्वधर्मीय संस्कृती एकत्रितरीत्या नांदत आहेत. सर्व धार्मिक वास्तू व अधार्मिक पुरातत्त्वीय वास्तू मोठ्या प्रमाणात आपल्या देशात आहेत. हा अनमोल ठेवा विकास या गोंडस नावाने पाडण्यात येऊन तेथे टोलेजंग इमारती बांधून कोणता विकास आपणास साधायचा आहे हेच आज आमच्या माणसांना समजत नाही.

आज हिंदुस्थानात ऐतिहासिक वारसा मोठय़ा प्रमाणात आहे. याची दखल युनेस्कोने घेऊन ३५ स्थळे ही जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली. यामध्ये २७ सांस्कृतिक, ७ प्राकृतिक, नैसर्गिक स्थळे, १ संमित्र स्थळ आहे. याची ओळख जागतिक स्तरावर आहे. केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे देखभाल करण्याची जबाबदारी आहे. पण अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे ही स्थळेसुद्धा संरक्षणापासून वंचित आहेत. या खात्याकडे ही संपूर्ण जबाबदारी असतानासुद्धा जागतिक वारसा स्थळेही सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रात अजिंठा, वेरूळ, एलिफंटा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही जागतिक वारसा स्थळे आहेत. परंतु या स्थळांची स्वच्छता, देखभाल मोठय़ा प्रमाणात होत नाही. त्यामुळे ही वारसा स्थळे दारूड्यांचे, रिकामटेकड्यांचे अड्डे बनलेली आहेत.

केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने राष्ट्रीय शहर वारसा विकास व वाढ योजना (HRIDAY) ही योजना २०१५ पासून अमलात आणली आहे. यामध्ये ऐतिहासिक वारसा असणाऱ्या शहरांचे सौंदर्यीकरण, संवर्धन व त्या शहराचे ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम या योजनेमध्ये करण्यात येणार आहे. ही योजना २०१५ ते २०१८ पर्यंत राबवली जाणार आहे. या योजनेचा खर्च ५०० करोड रुपये अपेक्षित आहे. यामध्ये अजमेर, अमरावती, अमृतसर, बदामी, द्वारका, बौद्धगया, कांचीपुरम, मथुरा, जगन्नाथपुरी, वाराणसी, वेलनकन्नी आणि वारंगल ही शहरे आहेत. या योजनेत अनेक ऐतिहासिक वारसा असणाऱया शहरांचा सहभाग नोंदवला नाही. काही शहरांचाच यामध्ये समावेश केला आहे. ऐतिहासिक शहरे असणाऱया संभाजीनगर, अहमदाबाद, हैदराबाद या शहरांचा समावेश केला नाही. त्यामुळे ही शहरे संवर्धन व सौंदर्यीकरणापासून वंचित राहिलेली आहेत आणि आपला ऐतिहासिक वारसा ठेवा जपणार कसा हे कोडे पडलेले आहे.

संभाजीनगर येथील ५२ दरवाजा असणाऱयांपैकी एक दरवाजा तो म्हणजे खास दरवाजा मध्यरात्री विकासाच्या नावाखाली पाडण्यात आला. तो विकासाला बाधक होता हे कारण सांगून कुणालाही न सांगता मध्यरात्री पाडण्यात आला. विकास झाला पाहिजे, परंतु विकासाच्या नावाखाली आपल्या शहरातील ऐतिहासिक वास्तू पाडून शहराची ओळख नष्ट करण्याचा डाव आहे.

मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी असणारे आंबेडकर भवन रातोरात जेसीबीच्या साहय़ाने पाडण्यात आले आणि आंबेडकरांचा ऐतिहासिक वारसा असणारी इमारत जमीनदोस्त करण्यात आली. विकासाच्या नावाखाली सिमेंटचे जंगल शहरामध्ये उभे करण्यात येत आहे. पण आपली व आपल्या शहराची ऐतिहासिक ओळख ही या वारशांमुळेच होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

अलीकडेच बीड जिल्हय़ातील अंबाजोगाई येथील रेणुकामाता मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून मंदिराच्या आजूबाजूस खोदकाम करण्यात आले. त्यामध्ये अनेक प्रकारच्या मूर्ती सापडल्या. त्यात इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या शिलालेखाचे दोन तुकडे झाले आहेत. त्यातील काही भाग हा नष्ट झाला आहे. त्यामधूनच नवा इतिहास उजेडात येणार होता. परंतु स्वच्छतेच्या नावाखाली तो नष्ट करण्यात आला. असा स्वच्छतेच्या नावाखाली आपला वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न माणूस करीत आहे. आपला इतिहास आपणच नष्ट करतो की काय, असा प्रश्न सातत्याने पडणार आहे.

शाळा, महाविद्यालयांमध्ये ऐतिहासिक वारसा कसा जपावा याची जाणीव जागृती करणे, प्रत्येक शहरातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, लेणी, किल्ले यांची इत्थंभूत माहिती संकलित करणे, शहर, गावातील हेरिटेज कमिटी सक्षम करणे, दर महिन्याला ऐतिहासिक वारसा असणाऱया वास्तूंमध्ये स्वच्छता अभियान राबविणे, राज्य पुरातत्त्व, केंद्रीय पुरातत्त्व, स्थानिक व राष्ट्रीय स्तरावर इतिहास व पुरातत्त्व अभ्यासकांच्या मदतीने हेरिटेज वॉक करणे, आपल्या शहराची ओळख ही वास्तूवरून होत असते. ती माहिती सर्वसामान्य जनतेला पुरविणे आवश्यक आहे. नागरी शास्त्र, इतिहासाच्या अभ्यासकांनी आपला वारसा जपला पाहिजे. वास्तूची माहिती पुस्तिका फोल्डरच्या स्वरूपात दिली पाहिजे. राजकीय नेते, स्वयंसेवी संस्थांनी ऐतिहासिक वास्तू दत्तक घेऊन त्याचे संरक्षण केले पाहिजे. ऐतिहासिक वारशाजवळ अतिक्रमणे मोठय़ा प्रमाणात होतात  ती न होऊ देता त्या वारशाचे जतन केले पाहिजे. ऐतिहासिक वारशाची पडझड होत असल्यास राज्य पुरातत्त्व, केंद्रीय पुरातत्त्व व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी पार पाडावी.

वरील उपाययोजना आपण काळजीपूर्वक केल्या तर आपला ऐतिहासिक वारसा राहील; अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या वास्तूचा फोटो पाहून किंवा येथेच ही वास्तू होती असे पुढच्या पिढीला सांगावे लागेल. असे न होण्यासाठी शहरातील प्रत्येकाने आपले परमकर्तव्य समजून हा ऐतिहासिक वारसा जपला तरच आपण आपला इतिहास सांगू शकतो. आज ही प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाची जबाबदारी आहे. तो आपला वारसा आपणच
Similar questions