आपण फळे आणि पालेभाज्या का खातो? वनस्पतींनाही आपल्याप्रमाणेच खनिजांची गरज असते का?
Answers
1) For getting more fiber and carbohydrates from them.
2) yes, absolutely they also need minerals.
Answer:
आपण फळे आणि पालेभाज्या खातो कारण त्याचे अनेक फायदे आहेत.
फळे आणि पालेभाज्यांमुळे आपल्याला भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिज पदार्थ मिळतात.त्यात वेगवेगळे प्रकारचे पोषक तत्व,फाइबर व एन्टीऑक्सीडेंट असतात.फळे आणि पालेभाज्या खाण्याने आपले शरीर स्वस्थ व तंदुरुस्त बनते.आपण आजारांपासून दूर राहतो.आपले पाचनतंत्र मजबूत बनते.
फळे आणि पालेभाज्यांमध्ये कैलोरीचे,फॉट्सचे प्रमाण कमी असते,त्यामुळे फळ व पालेभाज्या खाल्याने आपल्याला ऊर्जा मिळते व आपल्याला उत्साहपूर्ण वाटते,तसेच पोट भरल्यासारखे वाटते.आपले केस व त्वचा सुंदर होते.
वनस्पतींनाही आपल्याप्रमाणेच खनिजांची गरज असते कारण,
खनिज वनस्पतींना प्रकाश संश्लेषण आणि क्लोरोफिलची निर्मिती करण्यात मदत करतात.वनस्पतींना आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करतात,फळे आणि पाने बनवण्यास मदत करतात.
काही खनिज वनस्पतींची वाढ करण्यात,बी निर्मितीमध्ये मदत करतात व वनस्पतीच्या मूळांना मजबूत बनवतात.वनस्पतींच्या विविध कार्यांमध्ये खनिज महत्वपूर्ण भूमिका निभावतात.जसे आपल्या शरीराला खनिजांची गरज असते, तसेच वनस्पतींनासुद्धा मजबूत बनण्यासाठी खनिज उपयोगी ठरतात.
Explanation: