India Languages, asked by Siddes8555, 1 year ago

आत्मकथा शेतकरी In marathi

Answers

Answered by dalvividya
9

Answer:

मी शेतकरी माज्यामुळे तुम्ही चांगल आयुष्य जगत आहे.पण माझा विचार कोणी करत नाही.मी उपाशी झोपतो ते सर्वाना चालत पण माझयामुळे कोणी उपाशी झोपलं नाही पाहिजे.जेव्हा आम्हाला आमच्या भाज्यांची चांगली किमंत मिळत नाही म्हणून आम्ही आत्महत्या करतो.

Answered by Anonymous
14

⠀⠀⠀⠀⠀⠀⠀आत्मकथा शेतकरी

मी आहे एक छोटा शेतकरी. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे. फारशी सुपीक नाही; पण नापीकही नाही. या जमिनीवरच आजवरच्या आमच्या पिढ्या पोसल्या गेल्या आहेत. या जमिनीवर माझं जिवापाड प्रेम आहे; पण या प्रेमानं काय भागणार? पीक अवलंबून असतं ते त्या लहरी राजावर म्हणजे आपल्या पावसावर!

आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी नाही. लहानसहान नदयांना पाणी असतं, पण तेही पावसावरच अवलंबून. उन्हाळ्यात त्यापण आटून जातात. त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की, आम्हां शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. कुठं दिसतोय का आमचा काळा विठोबा ! म्हणजे काळा ढग हो! शेतं नांगरून ठेवायची, काटकुटं काढायचं, ढेकळं फोडायची आणि पावसाची वाट बघत राहायचं. अंग उन्हात नुसतं भाजून निघायचं, पण पाण्याचा पत्ताच नाही. चार-चार, पाच-पाच कोसांवरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात. मग कधीतरी अवचित मळभ येतं. अंग गदगदून निघतं. सोसाट्याचं वारं सुटतं. इतक्यात पावसाचे थेंब टपटप गळू लागतात. क्वचित कधीतरी गारा पडतात आणि गारांनी अंगण भरून जातं. सारा गाव-लहानमोठी, म्हातारीकोतारी त्या पावसात न्हाऊन निघतात. पावसात फक्त शरीरंच भिजतात, असं नाही; तर मनंही निवतात. आता शेतीला लागायला हवं. भिजलेल्या जमिनीत बी-बियाणं टाकायला हवं. पाऊसराजाने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात. पण सगळं काही अवलंबून त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक, मिळतील ते दाणे. त्यावर सगळं वर्ष काढायचं, हेच आम्हां कोरडवाहू शेतकऱ्यांचं नशीब ! पोळा झाला की पाऊस सरला. उरलेल्या आठ महिन्यांत दुसरं पीक घेता येत नाही. कमी पाण्यावरची नाचणी, वरईसारखी पिकं घ्यावी लागतात. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमचं दारिद्र्य! कायमची उपासमार! काय करणार? मग सावकाराचे उंबरठे झिजवावे लागतात

Similar questions