History, asked by Rayyan5878, 1 year ago

अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?

Answers

Answered by ayush4201
11
what to do with this?
Answered by giripriyaanvi
12

इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलीत म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले ग्रंथ.

अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन-जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरावस्तु प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालये व त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालये करतात.

लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुध्द माहिती पोहचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन नियतकालिके आणी इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात.

जे दस्तऐवज, पुरावस्तु इ.प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असतात ते संग्रहालय आणि अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात.

संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तु आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात.

अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या

ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग आहे.

अभिलेखागारांच्या व्यवस्थापनामध्ये -

१) महत्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे

त्यामध्ये कोणताही बदल न करता

सुरक्षित ठेवणे.

२) त्यांच्या सूची तयार करणे आणि ती

हवी तेव्हा उपलब्ध करून देणे.इ.कामे

महत्वाची असतात.

ही कागदपत्रे ऐतिहासीक दृष्टीने अत्यंत विश्वासार्ह

मानली जातात.

संगणकीय प्रणालीच्या उपयोगामुळे ग्रंथालय

आणि अभिलेखागारांचे व्यवस्थापन अपरिहार्य पणे

माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेलेले आहे.

Similar questions