२. अलेक्झांडर व राजा पुरु (पोरस) यांच्यात झालेला संवाद
नाट्यीकरण सादर करा.
Answers
Answer:इ.स.पू. ३२६ मध्ये झेलम नदीच्या काठी अलेक्झांडर आणि राजा पोरस यांच्यात लढाई झाली. या लढाईत राजा पोरसचा पराभव झाला. त्याला अलेक्झांडरच्या सैन्याने बंदी केले. यानंतर अलेक्झांडर आणि राजा पोरस यांच्यात पुढील संवाद झाला असावा.
अलेक्झांडर: सैनिकांनो, त्या पराभूत पोरसला आताच्या आता माझ्यापुढे हजर करा.
(सैनिक पोरसला अलेक्झांडरसमोर साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत घेऊन येतात.)
अलेक्झांडर- पोरस, शेवटी तुझा पराभव झालाच ना... बोल तुला कसे वागवायचे आता?
पोरस (ताठ मानेने)- एक राजा दुसऱ्या राजाला वागवतो तसेच मला वागवले जावे.
(अलेक्झांडर या उत्तराने आणि राजा पोरसच्या आत्मविश्वासाने प्रभावित होतो.)
अलेक्झांडर- व्वा! तू माझे मन जिंकलेस. आजपासून तू माझा मित्र आहेस. सैनिकांनो, या शूर राजाला साखळदंडातून मुक्त करा. आणि याचा आपण जिंकून घेतलेला प्रदेश त्याला पुन्हा देऊन टाका.
Explanation: