an autobiography on river in marathi
Answers
गा नदी ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. ब्रह्मपुत्रा (लांबी २,९०० कि.मी.) नदी खालोखाल ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. गंगेची लांबी २,५२५ कि.मी. आहे. तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातातील गंगॊत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातून वाहत वाहत बांगलादेशात प्रवेश करते. बांगलादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते. तेथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. सुंदरबनात बऱ्याच दुर्मीळ वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात.
हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानले आहे. तिला माता म्हटले गेले आहे. गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे. भारतातील पाटलीपुत्र (पाटणा), कनोज, कौशांबी, काशी, प्रयाग, मुर्शिदाबाद, मुंगेर, कांपिल्य, बेहरामपूर, कलकत्ता, इ. प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.
राजा रवी वर्मा यांनी काढलेले 'गंगा अवतरणाचे चित्र'
अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळत होती तर ब्रह्मपुत्रा नदी काही किलोमीटर पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्रेने पश्चिमेस वळण घेतले व आता दोन्ही नद्यांचा अरिचा येथे संगम होतो. या बदलास इ.स. १८९७ चा भूकंप काही अंशी कारणीभूत होता.
यमुना ही गंगेची उपनदी स्वतःच एक स्वतंत्र आणि मोठी नदी आहे. ती गंगेला प्रयाग येथे येऊन मिळते.
डॉल्फिनच्या दोन जाती गंगेमध्ये सापडतात. त्यांना गंगा डॉल्फिन आणि इरावती डॉल्फिन या नावाने ओळखले जाते. याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्कसुद्धा प्रसिद्ध आहेत. गंगा नदीमधील विरघळलेला प्राणवायूची पातळी झपाट्याने खालावत आहो त्यामुळे जलचर धोक्यात आले आहेत. नदीतील पाण्यातील वाढते प्रदूषण त्याचे मुख्य कारण आहे.
हिंदू धर्मातील गंगेचे स्थान
काव्यामधील गंगेचे स्थान
गंगेसंबंधी काही पौराणिक समजुती
संदर्भ आणि नोंदी
शेवटचा बदल २ महिन्यां पूर्वी V.narsikar कडून
संबंधित लेख