India Languages, asked by PriyaVaghela7599, 1 year ago

An essay on chhatrapati shivaji maharaj - janta raja in marathi

Answers

Answered by bestanswers
4

                                    जाणता राजा

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच गर्वाने ऊर भरून येतो. शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि  प्रेम नसलेला मराठी माणूसच नाही तर भारतीयही आपल्याला शोधून सापडणार  नाही.  

मोघलाई आणि आदिलशाही यांच्यात पिचणारी मराठी रयत बघून शिवरायांच्या माऊलीला, जिजाबाईंना, क्रोध अनावर झाला होता. अगदी लहान वयापासून त्यांनी छोट्या शिवबाला स्वराज्याचे स्वप्न दाखवले आणि शिवरायांनीही त्या स्वप्नाला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. दरी- खोऱ्यातील आपले सवंगडी, मावळे एकत्र जमवून त्यांनी परकीय आक्रमकांना अचंबित आणि भयभीत करून सोडले. अनेक लढाया लढल्या. प्रसंगी तह करून त्यांनी आपल्या रयतेचे रक्षण केले.

स्वराज्यासाठी आरमाराचे महत्व जाणून त्यांनी सुरुवातीपासून आरमार भक्कम केले. आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी  सतत स्वराज्याचा ध्यास घेतला होता. आपल्या साथीदारांना आणि सरदारांनाही त्यांनी स्वराज्याचे महत्व पटवून दिले होते. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या सरदारांनी आणि मावळ्यांनी जिवात जीव असेपर्यंत स्वराज्य जपले.  

आजही त्यांच्या आयुष्यातील अनेक नाट्यमय प्रसंग अंगावर रोमांच आणतात. स्त्री दाक्षिण्य असलेला, साधुसंतांचे आशीर्वाद लाभलेला,  गो-ब्राम्हण प्रतिपालक आणि रयतेचा राजा अशी बिरुदं अभिमानाने मिरवणारा हा रयतेचा 'जाणता राजा' होता.  

"शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप" या ओळी या थोर राजाचे यथार्थ वर्णन करतात.

Answered by laraibmukhtar55
2

                             छत्रपती शिवाजी महाराज

    शिवाजी भोंसले पहिला भारतीय योद्धा राजा आणि भोसले मराठा वंशाचा सदस्य होता. शिवाजीने विजापूरच्या घसरणार्‍या आदिलशाही सल्तनत वरून मराठा साम्राज्याच्या उत्पत्तीची स्थापना केली. १7474 In मध्ये त्यांचा रायगड येथे छत्रपती (सम्राट) म्हणून औपचारिकपणे राज्याभिषेक झाला.

    आयुष्यभर शिवाजी मुघल साम्राज्य, गोंकोंडाचा सल्तनत आणि विजापूरचा सल्तनत तसेच युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व वैर या दोन्ही गोष्टींमध्ये गुंतले. शिवाजीच्या सैन्य दलांनी मराठा प्रभावाचा विस्तार केला, किल्ले ताब्यात घेतले आणि बांधकाम केले आणि मराठा नौदल तयार केला. शिवाजीने सुसज्ज प्रशासकीय संस्थांसह एक सक्षम आणि पुरोगामी नागरी नियम स्थापन केला. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा आणि न्यायालयीन अधिवेशनांचे पुनरुज्जीवन केले आणि कोर्ट व प्रशासनात पर्शियनऐवजी मराठी आणि संस्कृतच्या वापरास चालना दिली.

Hope it helped...

Similar questions