Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा.

Answers

Answered by chirag1212563
119

जेव्हा भूकंपनाभीकडून तणाव निर्माण होतो तेव्हा ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ते सर्व दिशांनी लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे अग्रसर होत जाते. या भूपृष्ठाकडे येणाऱ्या लहरींना भूकंप लहरी असे संबोधतात. ह्या भूकंप लहरी प्रामुख्याने ३ प्रकारच्या असतात. १) प्राथमिक लहरी २) दुय्यम लहरी ३)भूपृष्ठ. ह्या लहरींचे प्रकार स्पष्ट करूया.

१) प्राथमिक लहरी :- या लहरी भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या भूपृष्ठाकडे अत्यंत तीव्रतेने येतात. ह्या लहरींना  मागे पुढे होण्याऱ्या लहरी असेही म्हणतात कारण जेव्हा ह्या लहरी  प्रवास करतात तेव्हा मार्गातील खडक मागे पुढे होतात. ह्याच कारणाने प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती मागे पुढे हलतात.

२) दुय्यम लहरी :- ह्या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा विध्वंसक असतात. कारण या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वरखाली होतात आणि नुकसानीचे प्रमाण खूप जास्त वाढते. ह्या लहरी फक्त घण पदार्थमधून प्रवास करतात.

३)भूपृष्ठ.:- जेव्हा प्राथमिक आणि दुय्यम लहरी  जवळ पोचतात तेव्हा भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. ह्या लहरी खूप विनाशकारी असतात.

Answered by gadakhsanket
60

★ उत्तर - भूकंप लहरींचे तीन प्रकार आहेत.

1)प्राथमिक लहरी - भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात.

भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या रेषेत सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येणाऱ्या या लहरींना प्राथमिक लहरी म्हणतात.

या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात.या लहरी घन, द्रव, व वायू या तिनही माध्यमांतून प्रवास करू शकतात, मात्र द्रवरूपातील प्रवरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो.प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठवरील इमारती पुढे - मागे हलतात.

2)दुय्यम लहरी - प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी म्हटले जाते.

या लाहरीही नाभीकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो.या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण,लहरींच्या वहनांच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात.या लहरी फक्त घनपदार्थातून प्रवास करतात.परंतु द्रावपदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात.या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात.

3)भूपृष्ठ लहरी - प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भुकवचत पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात.

धन्यवाद..

Similar questions