भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा.
Answers
भूकंप होण्याची अनेक कारणे आहेत. सर्वात प्रथम तर भूकंप कसे होते हे समजून घेणे आवश्यक आहे. भूपृष्ठाच्या आत होत असलेल्या हालचालीमुळे पृथ्वीच्या पटावर प्रचंड ताण निर्माण होतो. जर हा ताण मर्यादांपलीकडे झाला तर ऊर्जा उत्सर्जन होऊन पृथ्वीतलाकडून पृथ्वीनाभीकडे उर्जालहरी निर्माण होतात आणि भूकंप घटतो. ह्याची प्रमुख करणे अशी आहेत.
१) भुतल सरकणे
२) भूपट्ट एकमेकांवर आदळने
३) भूपट्ट एकावर एक होणे
४) भूपृष्ठाअंतर्गत ताण निर्माण होऊन खडक विभंग होणे
५) ज्वालामुखीचे उद्रेक होणे
★ उत्तर - भूकंप करण्याची कारणे .
1)भूपट्ट सरकणे- भूपट्ट तरंगत असताना एकमेकांना घसटत एकमेकांपासून दूर सरकतात त्यामुळे भूकंप होतो.
2)भूपट्ट एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो.
3)भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे.- भूअंतर्गत शक्ती व बाह्यशक्तींचा भूपृष्ठावर परिणाम होत असतो .भुहालचालींमुळे भूपृष्ठावरील किंवा भूपृष्ठाखालील खडकांवर दाब किंवा ताण पडून खडकांना भेगा पडतात त्यामुळे खडकांचे समतोलत्व बिघडते.आणि खडक दुभंगतात व त्यांचे स्थानांतर होते. खडक खाली सरकतात किंवा वर उचलले जातात.
4)भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे. - भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होतो.
5)ज्वालामुखींचे उद्रेक होणे.- सर्वसाधारणपणे ज्या भागात ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्या भागात भूकंपाचे धक्के नेहमी बसत असल्याचे आढळतात.म्हणजेच ज्वालामुखीय प्रक्रिया ही भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे .अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात.
धन्यवाद...