भारता प्रमाणे ब्राझील मध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे. (भौगोलिक कारणे)
Answers
Answer:
भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येसुद्धा जंगलतोड प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्यामुळे तेथील जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत. तसेच तेथे शहरीकरणाचा वेगही सध्या वाढतो आहे. त्यामुळे तेथे प्रदूषणाची खूप वाढ झाली आहे. याचा परिणाम तेथील वन्यसंपत्तीचे जीवन धोक्यात आले आहे.
ब्राझीलमध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. भारताप्रमाणेच तेथेही वन्यजीवांची बेकायदेशीर शिकार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तेथील वन्यजीवांची संख्या कमी होत चालली आहे.
या कारणांमुळे भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येसुद्धा प्राणी आणि वनसंवर्धन करण्याची फार गरज आहे.
Explanation:
Answer:
i) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
ii) भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे. भारतातल्या 'झूम' सारख्या स्थलांतरित शेतीप्रमाणेच ब्राझीलमध्ये 'रोका' या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे.
iii) या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमधील प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. दोन्ही देशांत प्राण्यांच्या काही जाती दुर्मीळ होत आहेत. काही प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या प्रजातींच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे.