Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

भारतातील काेणती वने ब्राझीलमध्ये आढळत नाहीत?

Answers

Answered by fistshelter
8

Answer: ब्राझीलची वने आणि भारतीय वने हे दोन्ही प्रदेश जरी उष्ण कटिबंधात येत असले तरीही तापमान, आर्द्रता, भौगोलिक रचना, सागर प्रवाह आणि इतर कारणांमधील भिन्नतेमुळे तेथील जैवविविधतेमध्ये फार फरक आहे.

ब्राझीलमधील अमेझॉनचं जंगल हे मुख्यतः घनदाट पर्जन्यवनांचं असून अमेझॉन नदीच्या बाजूने विस्तारलं आहे. पर्जन्यवनांचं वैशिष्ट्य म्हणजे तेथे वर्षभर पाऊस पडत असतो. उष्ण कटिबंधिय पर्जन्यवनांमध्ये वर्षाला सरासरी २५० ते ४५० सेंमी इतका पाऊस पडतो. अमेझॉनचे वातावरण हे उष्ण आणि आर्द्र असल्याने तेथील वनसंपत्तीमध्ये विविधता आढळते.

भारतात प्रामुख्याने पानगळी वने आढळतात. पानगळी वनांतील बहुतांश वृक्षांची पाने ठराविक ऋतूमध्ये गळून पडतात. भारतातील भौगोलिक विविधता, प्रचंड लोकसंख्या यांमुळे भारतीय वने एकसंध न राहता वेगवेगळ्या क्षेत्रांत विभागली गेली आहेत. त्यामुळेच भारतात क्षेत्रागणिक वनस्पती आणि वन्यजीव यांत विविधता आढळून येते.

भारतातील उष्ण कटिबंधिय पानगळी वने आणि हिमालयीन पर्वतीय जंगले ब्राझीलमधे आढळत नाहीत.

Explanation:

Answered by swatitpatil1984
2

Answer:

ब्राझीलमध्ये सूचिपर्णी वने आढळत नाहीत

Similar questions