भारतातील विविधतेतील एकता विशद करा.
Answers
Answer:
प्रकरण 3 भारतीय समाजातील विविधता व एकता
Explanation:
प्रस्तावना भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे ही विविधता आणि एकता यांचे पैलू आणि निर्देशांक समजून घेणे आवश्यक आहे.भारताची संस्कृती समृद्ध व विविधतेने नटलेली आहे तसेच ती सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे धर्म,जात.भाषा.वंश,पंथ,संस्कृती ,सामाजिक रूढी ,संस्कृतिक आणि उप सांस्कृतिक श्रद्धा,राजकीय तत्वज्ञान आणि विचारधारा भौगोलिक असे काही भारतातील वैविध्याचे ठळक स्त्रोत आहेत. एकात्मभावामुळे वैविध्यपूर्ण वांशिक समुदाय आणि त्यांच्या श्रद्धा जोडल्या जातात विविधतेत एकता हे सूत्र सामाजिक बांधणी जात लिंगभाव पंथ संस्कृतीयांनी धार्मिक पद्धतीतील व्यक्तीगत आणि सामाजिक फारकातून अधोरेखित होते या प्रकरणात आपण देशातील विविधता,एकता तसेच देशातील एकतेला आव्हान निर्माण करणार्या वांशिक,धार्मिक,प्रादेशिक,जातीय,वर्गीय आणि लिंगभावात्मक घटकांचाही विचार करणार आहोत