भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते?
Answers
Answer:
भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांना विस्तृत सागरकिनारा लाभला आहे. ब्राझीलला सुमारे ७४०० किमी चा आणि भारताला ७५०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
दोन्ही देशांमध्ये पारंपरिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मस्त्यव्यवसाय चालतो. तसेच खाऱ्या पाण्यातील मासेमारी हे ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांतील साम्य आहे.
मासेमारी व्यवसायाबाबत या दोन्ही देशांतील फरक म्हणजे ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट वने आणि नद्यांच्या पाण्याचा वेग यांमुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही. तर भारतामध्ये नद्या, कालवे, तलाव यांमधून गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली आहे. भारतात एकूण मासेमारी उत्पादनापैकी सुमारे ६०% वार्षिक उत्पादन हे गोड्या पाण्यातील मासेमारीमुळे मिळते.
Explanation:
उत्तर :-
अ) भारत व ब्राझील या देशांत चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य :-
१) भारत व ब्राझील या देशांतील किनारपट्टीच्या भागात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे.
२) भारत व ब्राझील या दोन्ही देशांत खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते.
ब) भारत व ब्राझील या देशांत चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील फरक :-
१) भारतात ठिकठिकाणी नद्या, तळी, सरोवरे इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते. परंतु, ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट जंगले, नद्यांच्या पाण्याचा वेग यांमुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही.
२) ब्राझीलजवळ उष्ण व सागरी प्रवाह एकत्र येतात. प्रवाहांच्या संगमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लवक वाढते. प्लवक हे माशांचे खाद्य असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात. परिणामी, ब्राझीलमध्ये मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. याउलट, भारताजवळ अशा प्रकारे सागरी प्रवाह एकत्र येत नसूनही इतर अनुकूल घटकांमुळे भारतात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे.